agriculture news in marathi, In Igatpuri farmer opposed to Samruddhi highway | Agrowon

समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार इगतपुरीत कायम
ज्ञानेश उगले
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार इगतपुरी तालुक्यातील अद्याप कमी झाली नाही. हे हेरून शेतकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी समृद्धीबाधित कृती समितीच्या पदाधिकाऱ्यासमवेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. त्यात शेतकऱ्यांच्या वतीने हा महामार्ग रद्द करावा, अन्यथा दुसरीकडून हलवावा ही प्रमुख मागणी करण्यात आली. त्यावर गिरीश महाजन यांनी आपण मुख्यमंत्री व शेतकऱ्यांची लवकरच बैठक घेऊन यावर ठोस उपाययोजना करू, असे आश्‍वासन दिले.

घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार इगतपुरी तालुक्यातील अद्याप कमी झाली नाही. हे हेरून शेतकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी समृद्धीबाधित कृती समितीच्या पदाधिकाऱ्यासमवेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. त्यात शेतकऱ्यांच्या वतीने हा महामार्ग रद्द करावा, अन्यथा दुसरीकडून हलवावा ही प्रमुख मागणी करण्यात आली. त्यावर गिरीश महाजन यांनी आपण मुख्यमंत्री व शेतकऱ्यांची लवकरच बैठक घेऊन यावर ठोस उपाययोजना करू, असे आश्‍वासन दिले.

या वेळी शिष्टमंडळाने अनेक विषयांवर चर्चा केली असता तालुक्यातील ७२ टक्के जमीन संपादन केली आहे, बाधित २३ गावांपैकी १९ गावे पेसाअंतर्गत आहेत, बहुतांश धरणे इगतपुरीत असल्याने राहिलेली जमीन सिंचनाची आहे, त्यामुळे ही जमीन वाचवावी, बाधित जमिनीचा रेडिरेकनर दर हा शहापूरपेक्षा खूपच कमी असल्याने परत सुधारित दरपत्रक जाहीर करावे, बाधितांना शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी तरतूद करण्यात यावी, अशा अनेक मागण्यांचे निवेदन या वेळी देण्यात आले.

या शिष्टमंडळात महापालिकेचे सभागृह नेते दिनकर पाटील, माजी आमदार शिवराम झोले, कृती समितीचे अध्यक्ष कचरू डुकरे, सचिव भास्कर गुंजाळ, मधुकर कोकणे, अरुण गायकर, संपतराव काळे, दौलत दुभाषे, रतन लंगडे, मच्छिंद्र भगत, जयराम काळे, भागवत गुंजाळ, राजेंद्र भटाटे, वसंत भोसले, ज्ञानेश्‍वर तोकडे, रामेश्‍वर शिंदे, शिवाजी भोसले उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...