जागतिक गहू उत्पादन ७४८ दशलक्ष टनांवर

जागतिक गहू उत्पादन ७४८ दशलक्ष टनांवर
नवी दिल्ली : जगातील गहू उत्पादन यंदा (२०१७-१८) ७४८ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज अांतरराष्ट्रीय धान्य परिषदेने (अायजीसी) व्यक्त केला अाहे.
 
याअाधी अाॅगस्टमध्ये ७४२ दशलक्ष टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात अाला होता. अाता सुधारित अंदाज अहवालातून उत्पादन वाढणार असल्याचे संकेत देण्यात अाले अाहेत.
 
रशियामध्ये अपेक्षेपेक्षा अधिक गहू उत्पादन होण्याची शक्यता अाहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) जगातील गहू उत्पादन १.७ दशलक्ष टनांनी वाढून ते ७४४.९ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज व्यक्त केला अाहे.
 
दरम्यान, जगात सध्या गव्हाचा २४८ दशलक्ष टन साठा शिल्लक अाहे. हा साठा अधिक असून, त्यात अाता वाढीव उत्पादनाची भर पडणार अाहे.
 
अर्जेंटिना, अमेरिकेत मका उत्पादन वाढणार
जगातील मका उत्पादन यंदाच्या वर्षात १०२९ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे. अर्जेंटिना अाणि अमेरिकेत मका उत्पादन वाढणार अाहे. 
जगातील मक्याचा व्यापार २ दशलक्ष टनांनी वाढून १४८ दशलक्ष टनांवर पोचेल, असेही धान्य परिषदेने नमूद केले अाहे.
 
भात उत्पादन ४८३ दशलक्ष टनांवर
जगातील भात उत्पादन ४८३ दशलक्ष टन होण्याचा अंदाज अाहे. अमेरिका अाणि चीनमधील भात उत्पादनात घट होण्याची शक्यता अाहे. तसेच जगातील भाताचा साठा ११८ दशलक्ष टनांवरून ११७ दशलक्ष टनांपर्यंत खाली अाला अाहे, असे अांतरराष्ट्रीय धान्य परिषदेने अहवालात म्हटले अाहे.
 
सोयाबीन उत्पादन घटणार
जगातील सोयाबीन उत्पादन घटणार असल्याचे संकेत धान्य परिषदेने दिले अाहेत. यंदा जगात ३४८ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज अाहे. गेल्या वर्षी ३५१ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते. सोयाबीनचा शिल्लक साठा ४२ दशलक्ष टन राहण्याची शक्यता व्यक्त केली अाहे.
 
जगातील गहू उत्पादन अंदाज (दशलक्ष टनांमध्ये)
 
गहू २०१४-१५ २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८
उत्पादन ७३० ७३६ ७५४ ७४८
व्यापार १५३ १६६ १७६ १७४
वापर ७१५ ७१८ ७३६ ७४२
शिल्लक साठा २०६ २२४ २४२ २४८

स्रोत ः अांतरराष्ट्रीय धान्य परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com