agriculture news in marathi, Ignore the insurance company with damaged banana pananchamas | Agrowon

नुकसानग्रस्त केळीच्या पंचनाम्यांकडे विमा कंपनीचे दुर्लक्ष
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 जुलै 2018

``माझ्या केळीचे नुकसान झाले, मी विमा कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली. त्यांनी तक्रार नोंदवून तिचा क्रमांक मला मोबाईलवर संदेशाद्वारे मिळाला. परंतु पंचनामे झाले नाही. मी नुकसानग्रस्त बागेतील केळीची झाडे, घड तसेच सोडले आहेत. आणखी किती दिवस बाग अशीच ठेवणार? मला पुढे लागवड करायची आहे. कृषी विभागाकडेही याबाबत तक्रार केली आहे.``
- विशाल महाजन, शेतकरी, नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव)

जळगाव : जून महिन्यातील वादळी पावसात नुकसान झालेल्या मुक्ताईनगर, रावेर, यावल भागांतील विमाधारक केळी उत्पादकांनी संबंधित कंपनीकडे तक्रारी नोंदविल्या, परंतु कंपनीने अजूनही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
 
जून महिन्यात मुक्ताईनगर, रावेर भागांत वादळात सुमारे दीड हजार हेक्‍टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले. विमाधारक शेतकऱ्यांनी यासंदर्भात नियुक्त केलेल्या एचडीएफसी एर्गो कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. नुकसानीनंतर ४८ तासांत या क्रमांकावर किंवा कंपनीचा फॅक्‍स क्रमांक, इ मेलवर तक्रार नोंदविणे बंधनकारक होते. विमा कंपनीकडून संबंधित शेतकऱ्यांची माहिती घेण्यात आली. त्यात नाव, गट नंबर, गाव, बिगर कर्जदार की कर्जदार विमाधारक आहेत आदी मुद्दे घेण्यात आले. त्यानंतर एक यादी घेऊन संबंधित कंपनीचे कर्मचारी आले. त्यांनी माहिती घेतली. परंतु नुकसान क्षेत्राचे पंचनामेच केलेले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
 
नुकसानीबाबत जिल्ह्यातील खासदार व इतर लोकप्रतिनिधींनी केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेऊन भरपाईची मागणी केली. परंतु, यानंतरही शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाई देण्यासंबंधीची कार्यवाही विमा कंपनीकडून पूर्ण झालेली नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
 

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...