agriculture news in marathi, IHD, stroke increased by 50 pc, diabetes cases doubled in India | Agrowon

दुर्धर रोगांचा भारतीयांना विळखा
वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली ः भारतात गेल्या 25 वर्षांत हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह व कर्करोगासारखे विकार झपाट्याने वाढत आहेत. "द लेन्सेट' या वैद्यकीयविषयक मासिकात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली ः भारतात गेल्या 25 वर्षांत हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह व कर्करोगासारखे विकार झपाट्याने वाढत आहेत. "द लेन्सेट' या वैद्यकीयविषयक मासिकात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
भारतातील बहुतेक राज्यांमध्ये हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधित आजार, मधुमेह, कर्करोगाचे प्रमाण 1990 ते 2016 या काळात वाढलेले दिसले आहे. देशात झालेल्या मृत्युंपैकी हृदयाशी संबंधित आजार व पक्षाघातामुळे झालेल्या मृत्युचे प्रमाण 1990 मध्ये 15.2 टक्के होते, ते 2016 मध्ये 28.1 टक्कांपर्यंत वाढले. यात 17. 8 टक्के मृत्यू हृदयरोगामुळे तर 7.1 टक्के मृत्यू पक्षाघातामुळे झाले. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयरोगामुळे मरण ओढावण्याचे प्रमाण जास्त आहे.

पक्षाघाताचे प्रमाण मात्र दोन्ही गटात समान असल्याचे आढळले आहे.
रक्तवाहिन्यांसंबंधित आजारामुळे देशात 1990 मध्ये 13 लाख रुग्णांचा मृत्यू झाला. हेच प्रमाण 2016 मध्ये 28 लाख होते. हा आजार झालेल्या रुग्णांची संख्या 1990 मध्ये 2.57 कोटींहून वाढून 2016 मध्ये 5.45 कोटी झाली आहे. केरळ, पंजाब व तमिळनाडूत याचा प्रसार सर्वाधिक होता. आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, गोवा व पश्‍चिम बंगालमध्येही या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसले.

रक्तवाहिन्यांच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या
1990 : 13 लाख
2016 : 28 लाख

भारतात असंक्रमित रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहेच. मात्र तुलनेने अविकसित असलेल्या राज्यांमध्ये रक्तातील कमतरमुळे हृदयरोग व मधुमेहाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे, ही गोष्ट अधिक चिंताजनक आहे.
- प्रा. बलराम भार्गव, महासंचालक 

इतर ताज्या घडामोडी
पशुपालकांना संस्थांनी मदत करावी ः शरद...निमगाव केतकी, जि. पुणे   ः सध्याच्या...
परभणी : धरणांच्या जलाशयातील उणे...परभणी ः वाढते तापमान, बेसुमार उपसा, वेगाच्या...
नाशिक : पाणीटंचाई आणि चाऱ्याच्या...अंबासन, जि. नाशिक : बागलाण परिसरातील गावागावांत...
देगावात दुष्काळाचा फळबागांना मोठा फटकावाळूज, जि. सोलापूर : यंदाच्या भीषण दुष्काळाचा...
वऱ्हाडाला केंद्रीय मंत्रिपदाची अपेक्षाअकोला : या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी...
केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या...मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत...
कॉँग्रेस नेते मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने...नगर  ः कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते...
सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला विनंती करू ः...शेटफळगढे, जि. पुणे : यूपीए सरकारच्या काळात आपण...
रत्नागिरी, कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम...पुणे  : ग्राहकांची विशेष पसंती असलेल्या...
नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे...नगर ः उसासोबत ज्वारीचे आगार म्हणून ओळख असलेल्या...
विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत १...अमरावती : विमा कंपन्यांच्या हेकेखोरपणापुढे...
यवतमाळ बाजार समितीत हळद खरेदीस प्रारंभयवतमाळ  ः जिल्ह्यात हळदीखालील क्षेत्रात वाढ...
शेतकऱ्यांना व्यापारी करण्यावर भर: कृषी...बारामती, जि. पुणे ः आपल्याकडे पिकणाऱ्या प्रत्येक...
पुणे बाजारात आले, टोमॅटोच्या भावात...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळ पाहूनही मदतीचं आश्वासन नाय दिलंकोल्हापूर/सांगली ः गेल्या महिन्यात आमच्याकडं...
अनेर काठावरच्या शिवारातही जाणवू लागली...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या...
जळगावात १८०; धुळे, नंदुरबारात टॅंकरची...जळगाव ः खानदेशात सुमारे एक हजार गावे टंचाईच्या...
लाकडी अवजारे हद्दपार; सुतारांवर...रिसोड, जि. वाशीम ः आधुनिकतेचे वारे शेतीतही वाहू...
कसणाऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास...विकसनशील देशांमध्ये कृषी उत्पादकता आणि उत्पन्नाची...
जळगाव बाजार समितीती कांदा दरात सुधारणाजळगाव ः लाल कांद्याची आवक अस्थिर असून, दरात मागील...