गुजरातच्या गीर अभयारण्यात चोरट्या शिकारी

गुजरातच्या गीर अभयारण्यात चोरट्या शिकारी
गुजरातच्या गीर अभयारण्यात चोरट्या शिकारी

अहमदाबाद : वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे गुजरातेतील गीर अभयारण्यातील सिंह आणि चिंकारांना धोका निर्माण झाला आहे. उन्हाळी सुटीमुळे येणारे पर्यटक त्यांच्या वाहनांमधून सिंहांचा अक्षरशः पाठलाग करत आहेत, तर दुसरीकडे, जिवंत आमिष बांधून सिंह कशी शिकार करतात, हे दाखविण्याचा बेकायदा उद्योगही जोरात आहे. गीर अभयारण्यात चोरट्या शिकाऱ्यांनी एका चिंकाराची हत्या केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. त्यात एकाला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील एका शिकारी टोळीने 2008 मध्ये सहा सिंहांची येथे हत्या केली होती. खंबाजवळच्या मितयाला विभागात चोरट्या शिकाऱ्यांचा मुक्काम असल्याची माहिती मिळाल्यामुळे वन विभागाचे शंभर कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. हे चोरटे एवढे निर्ढावले आहेत, की वन कर्मचाऱ्यांसमोरच एकाने चिंकाऱ्याला गोळी घातली. त्याला पकडण्यात आले. मात्र, त्याचे दोघे साथीदार फरारी आहेत. या घटनेचे वृत्त समजताच, उप वनसंरक्षक टी. कुरपप्पूस्वामी यांनी शंभर कर्मचारी घटनास्थळी रवाना केले. या संदर्भात कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याचीही शक्‍यता आहे. जिवंत आमिष दाखवून सिंहांना आकर्षित करण्याचा उद्योगही सुरू आहे. धारीजवळ असा प्रकार घडल्याचे एका व्हिडिओवरून उघडकीस आले आहे. या प्रकारात जिवंत आमिष म्हणून गाय बांधण्यात आली होती. या संदर्भात सोहिल गराना याला अटक करण्यात आली आहे. वन खात्याने केलेल्या चौकशीनंतर अब्दुल रेहमान ऊर्फ हमील मरफानी, अब्बासी इक्‍बाल जरीवाला, वासिमखान इक्‍बाल बलुच, आशिष चौहान, असिफ शेख आणि असिफ महंमद थैयाम या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सिंहांसाठी दहा हजार चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी वनसंरक्षक आणि मार्गदर्शकांच्या मदतीने सिंह न दिसलेल्या पर्यटकांबरोबर संपर्क साधत असत. काही फार्महाउसबरोबरही त्यांची हातमिळवणी होती. तेथे पर्यटकांना व्हिडिओ दाखविले जात असत. पाच ते दहा हजार रुपये दिल्यास, सिंह दाखविले जात असत. सिंह शिकार करतानाचे शूटिंग करावयाचे असल्यास, दहा ते 15 हजार रुपये घेतले जात होते, असे चौकशीत आढळले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com