agriculture news in marathi, illegal planting of Bt on 20 percent of Vidarbha area | Agrowon

विदर्भात २० टक्‍के क्षेत्रावर अवैध बीटीची लागवड
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

नागपूर : तणाला प्रतिकारक जनुक असलेल्या नव्या बीटी तंत्रज्ञानपूरक वाणाची विदर्भात सुमारे २० टक्के क्षेत्रावर अवैधरीत्या लागवड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात हे क्षेत्र सर्वाधिक असल्याचा दावा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ खासगीत बोलताना व्यक्‍त करतात. या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठीच हा प्रकार करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

नागपूर : तणाला प्रतिकारक जनुक असलेल्या नव्या बीटी तंत्रज्ञानपूरक वाणाची विदर्भात सुमारे २० टक्के क्षेत्रावर अवैधरीत्या लागवड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात हे क्षेत्र सर्वाधिक असल्याचा दावा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ खासगीत बोलताना व्यक्‍त करतात. या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठीच हा प्रकार करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

विदर्भात सर्वदूर या वर्षी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने एकूणच बीटी तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. भारतीय कृषी संशोधन परिषदेने मात्र सद्या कापसात इतर कोणतेच पर्यायी तंत्रज्ञान नसल्याचे सांगत बीजी-२ तंत्रज्ञानाच्या वापरावरच शिक्‍कामोर्तब केले. मोन्सॅटो कंपनीकडून तणाला प्रतिकारक बीजी-३ तंत्रज्ञानाच्या चाचण्या तीन वर्षांआधी घेण्यात आल्या होत्या. केंद्रीय कापूस संशोधन संस्था तसेच जालना परिसरात या चाचण्या घेण्यात आल्या. या तंत्रज्ञानाला विरोध होत गेल्याने हे तंत्रज्ञान भारतात न देण्याचा निर्णय होत चाचण्यादेखील थांबविण्यात आल्या. परंतु या वर्षी मोठ्या प्रमाणावर तणप्रतिरक जनुक असलेल्या वाणाची लागवड विदर्भात झाली आहे. त्यामध्ये वर्धा, यवतमाळ हे जिल्हे आघाडीवर आहेत.

अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेली ३५ लाख पाकिटे एकट्या यवतमाळ जिल्ह्यात विकल्या गेल्याची भीती वर्तविली जात आहे. चोरट्या मार्गाने या वाणांचा पुरवठा झाल्याचा दावा होत असला तरी बीजी-३ या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या वाणाकरिता बीजोत्पादन कसे, कोणी आणि कोठे केले गेले हादेखील संशोधनाचा विषय ठरत आहे. उर्वरित विदर्भात सुमारे २० टक्‍के क्षेत्रावर बीजी-३ या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या कपाशीची लागवड झाली. हा प्रकार गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच झाल्याचा आरोपही या क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवित आहेत. कापसावर या वर्षी अनेक कारणांमुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्याच्या नियंत्रणासाठी कराव्या लागणाऱ्या फवारणीमुळे अनेकांचे बळी गेले. त्यानंतर अवैध बीटी वाणांची विक्री झाल्याची बाब सर्वांसमोर आली. फवारणीमुळे विषबाधा प्रकरण पुढे आले नसते तर हा प्रकार बिनबोभाट सुरू राहिला असता, असेही तज्ज्ञ सांगतात.

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...