agriculture news in marathi, IMD predicts 'normal' rainfall this year | Agrowon

देशात यंदा सर्वसाधारण माॅन्सून : हवामान विभाग
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९७ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी (ता. १६) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. यंदाचा माॅन्सून सर्वसाधारण स्वरूपाचा राहण्याच्या पूर्वानुमानामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९७ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी (ता. १६) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. यंदाचा माॅन्सून सर्वसाधारण स्वरूपाचा राहण्याच्या पूर्वानुमानामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

नवी दिल्ली येथे सोमवारी (ता.१६) आयोजित पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश, अंदाज विभागाचे प्रमुख डाॅ. डी. एस. पै. यांनी मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९५१ ते २००० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८९ सेंटिमीटर म्हणजेच ८९० मिलिमीटर आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४२ टक्के), तर दुष्काळाची शक्यता कमी (१४ टक्के) असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीच्या ९५ टक्के (उणे ५ टक्के) पाऊस पडला होता.

उत्तर अॅटलांटिक व उत्तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे डिसेंबर व जानेवारी महिन्यातील तापमान, हिंदी महासागराच्या विषुववृत्ताजवळील पृष्ठभागाचे फेब्रुवारी महिन्यातील तापमान, पूर्व आशियातील फेब्रुवारी व मार्च महिन्यांतील समुद्रसपाटीवरील हवेचा दाब, वायव्य युरोपमधील भूपृष्ठावरील हवेचे जानेवारी महिन्यातील तापमान व प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील उष्ण पाण्याचे फेब्रुवारी व मार्च महिन्यातील प्रमाण या घटकांच्या नोंदी विचारात घेऊन, ‘स्टॅटेस्टिकल एनसेंबल फोरकास्टींग सि.िस्टम’(एसईएफएस) चा वापर करून अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जूनच्या सुरुवातीला सुधारित अंदाज
हवामान विभागाने सोमवारी पहिला अंदाज वर्तविला असला, तरी मॉन्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाज जून महिन्याच्या सुरवातीला जाहीर केला जाणार आहे. मॉन्सून हंगामातील (जून ते सप्टेंबर) पाऊस, जुलै व ऑगस्ट महिनानिहाय पावसाचे पूर्वानुमान, भारताच्या चारही हवामान विभागांत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण त्या वेळी स्पष्ट करण्यात येणार आहे.

‘मॉन्सून मिशन’नुसार ९९ टक्के अंदाज
पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागातर्फे जानेवारी २०१७ मध्ये विकसित करण्यात आलेल्या ‘मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टींग सिस्टिम’ (एमएमसीएफएस) या माॅडेलनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीच्या ९९ टक्के पावसाचा अंदाज आहे. या अंदाजात पाच टक्के उणे-अधिक तफावतीची शक्‍यता गृहीत धरण्यात आली आहे. हे पूर्वानुमान वर्तविण्यासाठी वातावरण आणि समुद्रातील एप्रिल महिन्याची स्थिती विचारात घेण्यात आली आहे.

ला-निना स्थिती अोसरतेय
विषुुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याने गतवर्षी मध्यम ला-निना स्थिती निर्माण झाली होती. मात्र, यंदा वर्षाच्या सुरवातीलाच ही स्थिती ओसरण्यास सुरवात झाली. सध्या ही स्थिती कमकुवत झाली आहे. मॉन्सून मिशन माॅडेल आणि इतर जागतिक मॉडल्सनुसार मॉन्सूनचा हंगाम सुरू होण्यापुर्वी ला-निना स्थिती सर्वसाधारण होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ स्थितीचा माॅन्सूनवर प्रभाव पडत असल्याने त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यात येणार आहे. तसेच, बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसामान्य अाहे. माॅन्सून हंगामाच्या मध्यावर तो नकारात्मक होणार असला, तरी त्याची तीव्रता सौम्य राहणार आहे.

९६ ते १०४ टक्केमॉन्सूनच्या पावसाची शक्‍यता

 पावसाचे प्रमाण  शक्‍यता
 ९० टक्‍क्‍यांहून कमी  १४ टक्के
 ९० ते ९६ टक्के  ३० टक्के
 ९६ ते १०४ टक्के   ४२ टक्के
 १०४ ते ११० टक्के   १२ टक्के
 ११० टक्‍क्‍यांहून अधिक  ०२ टक्के

दृष्टिक्षेपात मॉन्सून अंदाज
मॉन्सूनच्या हंगामातील जून ते सप्टेंबर कालवधीसाठीचा हवामान विभागाने दिलेले अंदाज आणि प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची स्थिती (आकडे टक्क्यांमध्ये)

वर्ष- अंदाज- पडलेला पाऊस
२०१० ९८ १०२
२०११ ९८ १०२
२०१२ ९९ ९३
२०१३ ९८ १०६
२०१४ ९५ ८८
२०१५ ९३ ८६
२०१६ १०६ ९७
२०१७ ९६ ९५

 

इतर अॅग्रो विशेष
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...