`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`

`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`
`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`

सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण भागातून ग्रामस्थ, तलाठी यांच्यासह कोणाकडूनही पाण्याच्या टॅंकर मागणीबाबत प्रस्ताव आल्यास त्याची तातडीने दखल घ्या. स्वत: जाऊन स्थळपाहणी करून तातडीने टॅंकर सुरू करा, प्रस्ताव थांबवू नका, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले. 

सध्या जिल्ह्यात टॅंकर मागणीचे प्रमाण वाढले आहे. पण त्याच्या मंजुरीसाठी वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. त्या अनुषंगाने प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. विहिर अधिग्रहण, बोअर अधिग्रहण, टॅंकर, योजनांची थकीत वीज बिले, योजनांची दुरुस्ती यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, ज्योती पाटील आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी टॅंकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. तहसीलदारांकडून टॅंकर मागणीचा प्रस्ताव येताच स्थळपाहणी करा. त्यानंतर पाणी देण्यासाठी इतर कोणताच पर्याय नसेल, तर अन्य पर्याय शोधून टॅंकर सुरू करा, अशा सूचना डाॉ. भोसले यांनी दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे वीज बिल थकीत असल्याने बंद असलेल्या योजनांची थकीत बिलांची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या योजना तातडीने सुरू करायच्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com