agriculture news in marathi, implement 'e-nam'; Get the award, pune | Agrowon

‘ई-नाम’ राबवा; पुरस्कार मिळवा
गणेश कोरे
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पुणे : आॅनलािन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) याेजनेची बाजार समित्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, यासाठी राज्यातील पाच बाजार समित्यांना विशेष पारिताेषिक देऊन गाैरविण्यात येणार आहे. यासाठी अनुक्रमे पाच, तीन, दाेन लाख रुपये आणि उत्तेजनार्थ एक लाख रुपयांची दाेन असे पारिताेषिकांचे स्वरूप असणार आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

पुणे : आॅनलािन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) याेजनेची बाजार समित्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, यासाठी राज्यातील पाच बाजार समित्यांना विशेष पारिताेषिक देऊन गाैरविण्यात येणार आहे. यासाठी अनुक्रमे पाच, तीन, दाेन लाख रुपये आणि उत्तेजनार्थ एक लाख रुपयांची दाेन असे पारिताेषिकांचे स्वरूप असणार आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

पवार म्हणाले, ‘‘शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये अधिकाधिक पारदर्शीपणा आणण्याबराेबरच शेतकऱ्यांच्या शेतमालाला आॅनलाइन लिलावाद्वारे राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय पातळीवर आॅनलाइन बाजार संकल्पना राबविण्यात येत आहे. या याेजनेतील पहिल्या दाेन टप्प्यांत राज्यातील ६० बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यातील बाजार समित्यांसाठी प्रत्येकी ३० लाखांचा निधी वितरित करण्यात आला असून, २८ बाजार समित्यांनी आॅनलाइन लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये शेतमालाची बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच आॅनलाइन नाेंदणी आणि आॅनलाइन लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांसाठीचा निधी अद्याप प्राप्त झाला नसून, निधी लवकरच मिळेल.’’

ई-नामअंतर्गत शेतमालाची प्रवेशद्वारावरच संगणकीय नाेंद, वजन, शेतमालाचे वर्गीकरण, गुणवत्ता तपासणी, आॅनलाइन लिलाव, आॅनलाइन पेमेंट आणि आॅनलाइनच जावक नाेंद करण्यात येणार आहे. या पद्धतीमुळे शेतमालाच्या सर्व प्रकारच्या नाेंदी संगणकीय प्रणालीमध्ये हाेणार असल्याने शेतकऱ्यांची हाेणारी फसवणूक टाळता येणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम... वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती...
‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी... बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत...
शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरताअमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन...
राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधीनगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...