`सोलापुरात टंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करा`

सोलापुरात टंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करा
सोलापुरात टंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करा

सोलापूर  : टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्याची वेळेत आणि काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली.

दुष्काळ परिस्थिती, चाराटंचाई व पाणीटंचाईबाबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय स्तरावर बैठक घेण्यात आली. त्या वेळी त्यांनी ही सूचना केली. सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्यासह पुणे विभागातील अधिकारी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहून काम करणे गरजेचे आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाच्या आठ उपाययोजनांची अंमलबजावणी कटाक्षाने करावी. नळपाणी दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याबरोबरच पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने करावीत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तत्काळ सादर करावा. टंचाई परिस्थितीत जनावरांना निकषानुसार चारा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी संभाव्य चारा छावणीसाठी जागा, या ठिकाणी पाण्याची सोय, उपलब्ध विहिरींबाबत माहिती घ्यावी.’’

शहरी भागात आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. त्यासाठी आवश्यक जलस्रोतांची माहिती घेऊन योग्य ते नियोजन करावे. मनरेगाची मंजूर कामे गरजूंना उपलब्ध करून देऊन रोजगार द्यावा, अशा सूचनादेखील डॉ. म्हैसेकर यांनी केल्या.

महसूल, कृषी आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणा, जलसंपदा विभाग यांनी समन्वय ठेवून काम करावे. टंचाईबाबतच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांतील उपलब्ध पाणीसाठ्याची जिल्हानिहाय माहिती या वेळी त्यांनी घेतली. 

संबंधित जिल्ह्यात चारा व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठकीत दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com