‘आयात’बंदीच तारेल साखर उद्योगाला

‘आयात’बंदीच तारेल साखर उद्योगाला
‘आयात’बंदीच तारेल साखर उद्योगाला

कोल्हापूर : साखरेच्या दरात वाढ होण्यासाठी केवळ निर्यात अनुदानच न देता बाहेरून येणाऱ्या साखरेला पूर्णपणे आयातबंदी केली तरच कोसळणारे साखरेचे दर स्थिर राहून या साखर उद्योगाला दिलासा मिळणे शक्य आहे. गेल्या काही वर्षांतील केंद्राचा अनुभव पहाता आतापासूनच प्रयत्न केल्यास त्याचा लाभ कुठेतरी पुढच्या हंगामात होऊ शकेल या निष्कषापर्यंत या उद्योगातील घटक आले आहेत. यादृष्टीनेच केंद्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना भेटून सद्यःस्थिती सांगण्याचे काम वेगाने सुरू  झाले आहे.   फिलिपिन्स, इराणसारखी तत्परता महत्त्वाची यंदाच्या हंगामात तातडीने साखर निर्यात हाणे अशक्‍य असले तरी किमान पुढील हंगामात तरी आश्‍वासक निर्णय व्हावेत यासाठी शेतकरी संघटनांबरोबर साखर कारखानदार व साखर महासंघाच्या वतीनेही याबाबत आतापासूनच प्रयत्न केले जात आहेत. जागतिक बाजारात साखरचे दर घसरल्यानंतर फिलिपिन्स व इराणने तातडीने निर्णय घेऊन या उद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी प्रयत्न केले. एक महिन्यापूर्वीच या दोन्ही देशांनी त्यांच्या देशात होणाऱ्या आयातीवर बंदी घातली. याचा सकारात्मक परिणाम त्या देशातील स्थानिक बाजारांमधील दरवाढीवर झाला. अशीच तत्परता केंद्राने दाखविण्याची गरज असल्याचे या उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. 

पुढील हंगाम अधिक खडतर देशात यंदा पहिल्या टप्प्यात साखरेचे उत्पादन जास्त होणार नाही, असा अंदाज होता; पण परतीच्या पावसाने लावलेली हजेरी ही उत्पादनवाढीसाठी चांगली ठरली. अनपेक्षितपणे साखर उत्पादन वाढू लागले. केंद्रानेही एफआरपी वाढवून दिल्याने शेतकऱ्यांनी यंदाही ऊस लागवडीला प्राधान्य दिला आहे. एकूण क्षेत्राचा आढावा घेतल्यास पुढील हंगामात ५२ टक्के खोडवा आणि नवी लागवड असे चित्र राहण्याची शक्‍यता आहे. हे गृहीत धरून कोणत्याही परिस्थितीत पुढील हंगामाच्या प्रारंभापर्यंत केंद्राने हालचाली केल्या तरच सकारात्मक काहीतरी घडू शकते, असे देशपातळीवरील चित्र आहे. 

निर्यात बंद असल्याने उठाव कसा मिळणार? केंद्राचे साखर उद्योगाच्या बाबतीतले धोरण लवचिक नसल्याने त्याचा फटका या उद्योगाला गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रकर्षाने आणि सलग बसत आहे. वेळ निघून गेल्यावर निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याने फक्त कागदोपत्रीच चांगले निर्णय दिसतात. प्रत्यक्षात फायदाच होत नसल्याची कारखानदारांची तक्रार आहे. भारतातून जून 2016 ला साखरेची निर्यात झाली होती. त्यांनतर निर्यात ठप्प आहे. साखर निर्यातच होत नसेल तर देशांतर्गत बाजारात उठाव होणार कसा, असा सवाल कारखानदारांचा आहे  पदाधिकारी घेणार आज वाणिज्यमंत्र्यांची भेट प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आता साखर उद्योगातून वेगाने हालचाली होत आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्यासहित पदाधिकारी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी भेट घेणार आहेत. निर्यातीला असणारे 20 टक्के शुल्क दूर करावे, आयातबंदी करावी, तातडीने बफर स्टॉक करावा, या मागण्या या वेळी करण्यात येणार आहेत. भविष्यात पाकिस्तानातून आयात नाही? ऑक्‍टोबरमध्ये पंजाबमधील एका व्यापाऱ्याने लाहोरमधील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून तेथून वाघा बोर्डरमार्गे साखर भारतात आणली. पण त्यानंतर साखरेचे दर मोठ्या प्रमाणात कोसळल्याने संबंधित व्यापाऱ्याला मोठा तोटा सहन करावा लागला. हा अनुभव पाहता  भविष्यात व्यापारी आयातीचे धाडस करणार नसल्याची शक्‍यता उद्योगोतील सूत्रांची आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com