पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूध

 शेळीच्या दुधामध्ये पोषक तत्वाबरोबरच  रोगप्रतिकारक घटक व अनेक औषधी गुणधर्म असतात.
शेळीच्या दुधामध्ये पोषक तत्वाबरोबरच रोगप्रतिकारक घटक व अनेक औषधी गुणधर्म असतात.

भारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या दुधाचे सेवन केले जाते. परंतु, शेळीच्या दुधात विविध पोषक तत्त्वाबरोबरच रोगप्रतिकारक घटक व अनेक औषधी गुणधर्म असतात. शेळीच्या दुधाच्या विशिष्ट रचनेमुळे अर्भकांसाठी आणि वृद्धांच्या अन्ननिर्मितीसाठी हे दूध उत्तम प्रकारचा कच्चा माल म्हणून ओळखले जाते.   शेळीच्या दुधातून मानवी आरोग्यासाठी फायदेशीर अशी बरीच पोषक तत्त्वे मिळत उदा. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे इ. शेळीच्या दुधाचे गुणधर्म आणि फायदे पुढील प्रमाणे आहेत.

  • शेळीचे दूध पचनास हलके असते, कारण शेळीच्या दुधातील स्निग्ध पदार्थाच्या कणांचा आकार सूक्ष्म असतो. लहान बालकांना तर मातेच्या दुधाखालोखाल शेळीचे दूध पचायला हलके असते.
  • शेळीच्या दुधापासून अॅलजीर् होण्याची शक्यता कमी असते, कारण इतर दुधात आढळणारे व अॅलजीर्ला कारणीभूत असणारे प्रथिने शेळीच्या दुधात ९० टक्के कमी असते.
  • दूध पचताना तयार झालेले काही घटक प्रतिजैविके म्हणून कार्य करतात. ते हानिकारक जिवाणूंपासून संरक्षण देतात.
  • - काही घटक प्रीबायोटीक म्हणून कार्य करतात. अन्ननलिका आणि पोटात हे घटक रोगजनक जिवाणूंची वाढ रोखतात व संसर्गजन्य आजारांपासून रक्षण करतात तसेच पचनक्रिया सुधारण्याचे महत्त्वाचे काम करतात.
  • शेळीच्या दुधापासून क्वचितच Lactose Intolerance (लॅक्टोज असहायता) चा त्रास उद्भवतो. शेळीच्या दुधात लॅक्टोज कमी असते व शेळीचे दूध उत्तमरीत्या पचत असल्यामुळे लॅक्टोज असहायतेचा त्रास क्वचितच होतो.
  • जीवनसत्त्व A चांगल्या प्रमाणात असते. जीवनसत्त्व ए शरीराची वाढ होण्यास, रोग प्रतिकार शक्ती चांगली राहण्यास व दृष्टी चांगली राहण्यास फायदेशीर आहे.
  • इतर दुधांच्या तुलनेत शेळीच्या दुधातून अत्यावश्यक फॅटी अॅसिड/ मेदाम्ल चांगल्या प्रमाणात मिळतात.
  • शेळीच्या दुधातील CLA (conjugated linoleic acid) फॅटी अॅसिड शरीरातील विविध अवयवांचा दाह कमी करण्यास फायदेशीर आहे.
  • मानवी शरीरात तयार न होऊ शकणारी व शरीराच्या वाढीसाठी, रोगप्रतिकारक शक्तीसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अत्यावश्यक अमिनो आम्ले शेळीच्या दुधात जास्त प्रमाणात असतात.
  • अमिनो अाम्ल टॅारीन जास्त प्रमाणात असते. टॅीरीन अमिनो आम्ल हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यासाठी, रक्तदाब नियमनासाठी, दृष्टीसाठी अाणि मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर आहे.
  • कॅल्शिअम, फाॅस्फरस, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम ही खनिजे जास्त प्रमाणात असतात. कॅल्शिअम व फाॅस्फरस ही खनिजे हाडे व दात मजबूत ठेवण्यास फायदेशीर आहेत, पोटॅशिअम हे खनिज रक्तदाब तर मॅग्नेशिअम हे खनिज हृदयविकारापासून बचाव करण्यात फायदेशीर आहे.
  • - शेळीचे दूध पोटाचा सामू वाढवून आतड्यांचा दाह कमी करण्यासाठी मदत करते.
  • संपर्क : डॉ. अभिजित बाराते, ९१५६९८९८८९ (जीवरसायनशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com