agriculture news in marathi, importance of measurement of weight in livestock | Agrowon

जनावरांमध्ये वजन मापनाचे महत्त्व
डॉ. वैभव सानप, डॉ. प्रवीण पतंगे
मंगळवार, 8 मे 2018

जनावरांना दैनंदिन व्यवस्थापनात त्यांच्या शरीर वजनाच्या मापनाचे विशेष महत्त्व असते. जनावरांना लागणारा चारा आणि पाणी यांची गरज ही त्यांच्या शारीरिक वजनावर अवलंबून असते. तसेच बऱ्याच जनावरांची विशेषतः मांसल प्राण्यांची (शेळी, मेंढी इ.) बाजार किंमत ही त्यांच्या वाजनावरूनच ठरते. गर्भधारणा व योग्य प्रजननासाठी जनावराचे विशिष्ट वजन असणे आवश्यक असते. अशा अनेक कारणांमुळे जनावरांचे वेळोवेळी वजन करणे आवश्यक असते.

जनावरांना दैनंदिन व्यवस्थापनात त्यांच्या शरीर वजनाच्या मापनाचे विशेष महत्त्व असते. जनावरांना लागणारा चारा आणि पाणी यांची गरज ही त्यांच्या शारीरिक वजनावर अवलंबून असते. तसेच बऱ्याच जनावरांची विशेषतः मांसल प्राण्यांची (शेळी, मेंढी इ.) बाजार किंमत ही त्यांच्या वाजनावरूनच ठरते. गर्भधारणा व योग्य प्रजननासाठी जनावराचे विशिष्ट वजन असणे आवश्यक असते. अशा अनेक कारणांमुळे जनावरांचे वेळोवेळी वजन करणे आवश्यक असते.

वजन मोजणे का महत्त्वाचे अाहे
१. जनावरांसाठी आवश्यक दैनंदिन चारा आणि पाणी यांचे प्रमाण ठरविण्यासाठी त्यांचे वजन जाणून घेणे गरजेचे असते.
२. मांसल जनावरांचा (शेळी, मेंढी इ.) बाजारभाव ठरविण्यासाठी.
३. जनावरांचे पैदासक्षम वय तसेच त्यांचे गर्भधारणा व प्रजनन योग्य वय जाणून घेण्याकरिता.

  • जनावरांना तारुण्यावस्थेत पदार्पण करण्यासाठी आपल्या एकूण प्रौढ वजनाच्या ४५-५० टक्के वजन ग्रहण करणे आवश्यक असते.
  • प्रजननक्षम होण्यासाठी त्याचे वजन एकूण प्रौढ वजनाच्या ५५ टक्के असणे आवश्यक असते.
  • प्रथम वेतावेळी जनावराचे वजन प्रौढ वजनाच्या तुलनेत ८२ टक्के असावे.
  • दुसऱ्या वेताच्या वेळी जनावराचे वजन प्रौढ वजनाच्या तुलनेत ८२ टक्के असावे.
  • तिसऱ्या वेतापर्यंत जनावरांनी त्यांच्या प्रौढ वजनाच्या १०० टक्के वजन ग्रहण केलेले असते.

४. वजनावरून जनावरांच्या आरोग्यासंबंधी तसेच उत्पादन क्षमतेसंबंधी अंदाज बांधण्यास मदत होते.
५. जनावरांच्या प्रजनन क्षमतेविषयी अंदाज बांधता येतो.
६. आजारादरम्यान जनावरांना द्यावयाच्या औषध मात्रेसाठी वजनाचा उपयोग होतो.

सहसा ग्रामीण भागात पशुपालकाकडे जनावरांचे वजन मोजता येईल असा भव्य वजन काटा उपलब्ध नसतो. त्यामुळे जनावराचे वजन जाणून घेणे शक्य होत नाही. पुढील सूत्रांचा उपयोग करून जनावरांचे वजन काट्याविनासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मोजता येते. त्यासाठी केवळ एका लांबी मोजण्याच्या टेपपट्टीची आणि गणकयंत्राची (कॅल्क्युलेटर) आवश्यकता असते.

वजन मोजण्याची पद्धत
सर्वप्रथम टेप पट्टीने शरीराची लांबी (इंच) आणि छातीचा घेर (इंच) मोजून घ्यावा आणि या संख्या खालील सूत्रात टाकून गणना करावी. मिळालेले उत्तर हे त्या जनावराचे वजन असेल (पौंड मध्ये). (१ पौंड = ०.४५ किलो).

१. अग्रवाल यांचे सूत्र (Agarwal’s formula): अग्रवाल यांचे सूत्र हे देशी गायींसाठी उपयुक्त आहे.
वजन = शरीर लांबी × छातीचा घेर/Y

*शरीर लांबी ः जनावराची लांबी मोजून घ्यावी.
*छातीचा घेर ः छातीचा घेर मोजून घ्यावा.

Y ची किंमत ही छातीचा घेरानुसार बदलते. छातीचा घेर जर ६५ इंच ते ८० इंच या दरम्यान असेल तर Y ची किंमत ८.५ एवढी घ्यावी. जर हृदय छातीचा घेर ६५ पेक्षा कमी आणि ८० पेक्षा अधिक असेल तर Y ची किंमत ही अनुक्रमे ९ आणि ८ एवढी घ्यावी.

२. शेफर्स यांचे सूत्र (Shaeffer’s formula):
शेफर्स यांचे सूत्र हे विदेशी किंवा संकरीत जातींच्या गायींसाठी उपयुक्त आहे.
वजन = शरीर लांबी × (२ x छातीचा घेर)/३००

संपर्क ः वैभव सानप, ९४५५१४८१७२
(डॉ. सानप भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर, उत्तर प्रदेश येथे तर डॉ. पतंगे एटापल्ली, गडचिरोली येथे पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत अाहेत.)

फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
जनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
थंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...
वासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धतीवासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड...
रोपवाटिका उद्योगात उत्तम संधीकोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी...
जनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...
मुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
पशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
उष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
रेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...
दुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
जनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...
पोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...
वासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...