नोंदी ठेवून करा शेतीचे नियोजन

नोंदी ठेवून करा शेतीचे नियोजन
नोंदी ठेवून करा शेतीचे नियोजन

शेतीच्या नोंदी या अनुभव समृद्ध करण्यासाठी कामी येतात. शेतीतील दिवसभरातील, आठवडाभरातील जी काही महत्त्वाची कामे, आर्थिक देवाणघेवाण, खरेदी ई. इ. ची नोंद ठेवणे अपरिहार्य आहे. त्यामुळे शेतीमधून होणारा फायदा किंवा तोट्याची कल्पना येते.   शेतीच्या नोंदी किवा नोंदवह्या ठेवणे याचा मुख्य उद्देश व्यवसायावर नियंत्रण ठेवणे, भविष्यातील निर्णय घेणे आणि पुढील वर्षाचे नियोजन किंवा करावयाच्या कामांचा आराखडा तयार करणे हा आहे. शेतीतील नोंदी ठेवण्याचे मूलभूत फायदे नियोजन शेतीचे नियोजन करताना सर्वप्रथम चालू व्यवसायातील कोणकोणत्या त्रुटी आहेत हे पाहणे व त्यांचा अभ्यास करणे ही पहिली पायरी आहे. शेतीच्या नोंदवह्यांचे विश्लेषण कोणकोणत्या चुका झाल्या हे पाहण्यास मदत करतात. शेतीच्या पुढील वर्षीच्या नियोजनासाठी देखील शेतीच्या नोंदी खूप महत्त्वाचे काम करतात. व्यवस्थापन शेती व्यवसाय करताना रोजच्या नोंदी ठेवणे, सर्व कामांचे पूर्वनियोजन नोंद वहीमध्ये करणे या कामामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण होतो, तसेच उच्च प्रतीची अंतर्दृष्टी व्यवसायामध्ये निर्माण होऊ शकते. होणाऱ्या आर्थिक उलाढालीच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या व्यवसायातील शक्तिस्थाने व दुर्बलस्थाने सहज ओळखता येऊ शकतात. होणाऱ्या चुका समोर आल्या की त्या पुन्हा टाळल्या जातात, त्यामुळे एक उत्कृष्ट व्यवस्थापक बनता येऊ शकते. शेतीतील उत्पन्न शेतीच्या कामाच्या नोंदी आणि नोंदवह्या वर्षाच्या शेवटी कोणकोणती पिके, पूरक व्यवसाय हे नफ्यात आहेत किंवा अनुत्पादित आहेत हे समजून देण्यास मदत करतात. त्याचबरोबर सध्याचे उत्पन्न व संभाव्य उत्पन्न यामधील फरक अभ्यासता येतो, शेतीच्या नोंदी या सध्याचे उत्पन्न दर्शवितात. यामधून असे निष्पन्न होऊ शकते की सध्याचे शेतकऱ्याचे उत्पन्न व संभाव्य बदलानंतरचे त्याचे उत्पन्न याचा अंदाज आला की आहे त्या साधन संपत्तीमध्ये योग्य पावले उचलून शेतीतील उत्पन्न निश्चितपणे वाढवता येते. कृषी संशोधन आणि सरकारी धोरणे शेती संशोधनामध्ये मुख्यत: खर्च व उत्पन्नाच्या तंतोतंत नोंदी असणे खूप आवश्यक आहे. महत्त्वाची धोरणे ठरवण्यासाठीदेखील सरकारला खरी माहिती, योग्य नोंदीची आवश्यकता असते. सुस्थितीमध्ये व अचूक अशा ठेवलेल्या शेतीच्या नोंदी अशाप्रकारे कृषी संशोधकांना व सरकारी नियोजनांना एक प्रकारे मदत करते. आर्थिक पत वर्षानुवर्षे ठेवलेल्या नोंदी, कामासंदर्भातील बिले, ही त्याची उत्पन्न घेण्याची क्षमता दाखवत असतात व एक प्रकारे ती शेतकऱ्याची आर्थिक क्षमताच सिद्ध करत असतात. अशा प्रकारची सवय कोणत्याही शेतकऱ्यास विनासायास बँकेकडून किंवा आर्थिक संस्थेकडून कर्ज मंजूर करण्यास मदत करेल. शेती निविष्ठांचे नियोजन प्रत्येक हंगामात पिकाप्रमाणे किती साधने, खते, बि-बियाणे इ. लागतात याच्या नोंदी ठेवल्यास हंगाम सुरू होण्याअगोदरच त्यांचे नियोजन करता येईल. एेनवेळी होणारी तारांबळ यामुळे थांबू शकते व शेती व्यवसाय सुरळीत चालविता येऊ शकतो. नोंदी ठेवण्यातील अडचणी व मर्यादा १. आर्थिक साक्षरतेचा अभाव आर्थिक साक्षरते विषयीच्या अपुऱ्या ज्ञानामुळे नोंदी ठेवणे शक्य होत नाही. २. शेतीचे छोटे क्षेत्रफळ किंवा माणशी कमी मिळकत बऱ्याच शेतकऱ्याकंडे १ ते २ एकर शेती असते. कमी मिळकतीमुळे नोंदीचे महत्त्व वाटत नाही व सर्व व्यवहार हा तोंडी व लक्षात ठेऊन करण्यात समाधान मानतात. ३. सरकारी कर बसण्याची भीती वाटणे मिळत असलेले उत्पन्न सरकारी अधिकाऱ्यांना समजले तर कर भरावा लागेल, या भीतीपोटी नोंदी ठेवल्या जात नाहीत. ४. क्लिष्ट पद्धत रोजच्या रोज शेतीच्या नोंदी वहीमध्ये ठेवणे त्रासदायक वाटते. काही नोंदी ठेवताना बेरीज वजाबाकी इ. करण्याची वेळ येते. काही शेतकऱ्यांचे शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना शेतीच्या नोंदी वहीमध्ये ठेवण्याऐवजी डोक्यातच ठेवणे बरे वाटते. ५. शेतीचे स्वरूप शेतकरी दिवसभर शेतात राबत असतो, त्यामुळे थकवा येऊन संध्याकाळी इच्छा असून देखील तो व्यवस्थित बसून दिवस भराचा आढावा नोंद करू शकत नाही.   संपर्क : प्रसाद क्षीरसागर, ८७८८३८३०८७ (कृषी अर्थशास्त्र विभाग, के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com