agriculture news in marathi, Importance at the right time pruning, nutrient management | Agrowon

द्राक्ष उत्पादनात योग्य वेळी छाटणीला महत्त्व
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

सोलापूर : ‘‘द्राक्ष हे संवेदनशील पीक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यावर त्याची काळजी महत्त्वाची आहे. द्राक्षाची योग्य वेळी छाटणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनावर लक्ष दिल्यास द्राक्षाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढेल,’’ असे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत यांनी सांगितले.

सोलापूर : ‘‘द्राक्ष हे संवेदनशील पीक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यावर त्याची काळजी महत्त्वाची आहे. द्राक्षाची योग्य वेळी छाटणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनावर लक्ष दिल्यास द्राक्षाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढेल,’’ असे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत यांनी सांगितले.

कृषी विज्ञान केंद्रात नुकतेच द्राक्षपीक परिसंवाद आयोजिण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड होते. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय, द्राक्ष संघाचे खजिनदार महेंद्र शाहीर, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. एम. अमृतसागर, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, द्राक्ष संघाचे विभागीय अध्यक्ष शिवानंद माळी, राजेंद्र देशमुख, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे आदी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, ‘‘द्राक्षाची छाटणी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरनंतर करावी. त्यामुळे द्राक्षाच्या हंगामात चांगला दर मिळू शकतो. अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यासाठी द्राक्षामध्ये योग्य वेळ फार महत्त्वाची आहे. द्राक्ष संशोधन केंद्राने मेडिका हे नवीन वाण संशोधित केले आहे. अवर्षणप्रवण भागातही हे वाण उपयुक्त ठरणारे आहे.``

डॉ. सोमकुँवर, डॉ. उपाध्याय यांनी द्राक्ष उत्पादनातील विविध बाबी सांगितल्या. डॉ. तांबडे, अमोल शास्त्री , डॉ. पी. व्ही. कदम यांनीही मनोगत व्यक्त केले.

इतर बातम्या
वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी...अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही...
निताने येथे वीजवाहक तारांच्या... नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील...
'वसाका'ची चाके पुन्हा फिरणारनाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव''...
‘जानेफळ येथे सोयाबीन पेंड प्रक्रिया...अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून...
अमरावती जिल्ह्‍यात कर्जवाटपात...अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...
फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या...जालना : सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट जालन्याच्या...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे नगर : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
सांगलीतील आवर्तन बंद होण्याची शक्यतासांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन...नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती...
लोकसहभागातून ग्रामविकास अभियान :...सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या...
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...