agriculture news in marathi, Importing sugar from Pakistan trouble to sugar industry : Avhad | Agrowon

पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि साखर आयातही करायची : आव्हाड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

नागपूर : एकीकडे पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे त्यांच्याकडून साखर आयात करत भारतातील शेतकऱ्यांना मारायचे काम सध्या मोदी सरकार करत आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी (ता. १९) येथे केली. तसेच त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानची साखर वाटून या निर्णयाचा निषेध नोंदवला.

नागपूर : एकीकडे पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे त्यांच्याकडून साखर आयात करत भारतातील शेतकऱ्यांना मारायचे काम सध्या मोदी सरकार करत आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी (ता. १९) येथे केली. तसेच त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानची साखर वाटून या निर्णयाचा निषेध नोंदवला.

आमदार आव्हाड  म्हणाले, ''देशातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. सहकारी साखर कारखाने अस्तित्वाची लढाई लढत आहेत. एफआरफीवरून कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये संघर्ष सुरू असताना केंद्र सरकारने पाकिस्तानमधून १५ लाख मेट्रिक टन साखर आयात केली आहे. या निर्णयाने साखर उद्योग आणखी अडचणीत येणार आहे.

एकीकडे पाकिस्तानच्या नावाने खडे फोडत निवडणुका जिंकायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानातून कांदा, साखर आयात करून कांदा उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकायची, हा विरोधाभास आहे. सध्या साखरेचे दर ३,७०० रुपयांवरून ३,१०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. शेतकरी संघटना टनाला ३,५०० रुपयांची मागणी करीत आहेत. अशात साखर कारखानदारांना एफआरपी देणे परवडणार नाही.

केंद्र सरकारची साखर निर्यातीवर बंधने आहेत, साखरेवर निर्यात कर असल्याने निर्यात करणे परवडत नाही. साठ्यावर निर्बंध असल्याने कारखानदारांना मिळेल त्या दरात साखर विक्री करावी लागते. शेजारील पाकिस्तानातून केंद्र सरकारने या वर्षी १५ लाख मेट्रिक टन साखर आयात केली आहे. पाकिस्तानकडून निर्यातीसाठी अनुदान दिले जात आहे. त्यामुळे ही साखर देशात येऊन देशांतर्गत साखरेचे दर आणखी खाली येतील, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...