त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
बाजारभाव बातम्या
दर्जेदार केळीला ऑनसह १२०० रुपयांपर्यंत दर मिळेल. दर कमी होणार नाहीत, असे चित्र आहे. रावेर, फैजपुरातील केळीच्या मोठ्या खरेदीदारांना जळगाव, चोपडा भागातून केळी घ्यावी लागत आहे. कारण रावेर, यावलमध्ये केळी फारशी कापणीसाठी उपलब्ध नाही. बऱ्हाणपूरच्या बाजारातही केळीचा तुटवडा आहे.
- सुधाकर चव्हाण,
केळी व्यापारातील जाणकार
जळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच मागणीदेखील उत्तरेकडून अधिक आहे. सध्या खानदेशात फक्त चोपडा, जळगाव, पाचोरा भागात केळी कापणीसाठी उपलब्ध आहे. यामुळे दर टिकून आहेत. पुढेही दर चांगले राहतील, असे संकेत मिळत आहेत.
सध्या लगतच्या मध्य प्रदेशातील केळीच्या सर्वात मोठ्या बऱ्हाणपूर येथील बाजारातही केळीची आवक प्रतिदिन १०० ते ११५ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक होत आहे. बऱ्हाणपुुरातील खरेदीदारांना रोज किमान २०० ट्रक केळीची आवश्यकता आहे.
जळगावात सावदा (ता. रावेर) व फैजपूर (ता. यावल) येथील पुरवठादारांनाही प्रतिदिन २०० ट्रकची गरज आहे. परंतु, सध्या १५० ते १८० ट्रक केळी उपलब्ध होत आहे. मागील महिनाभरापासून मागणी अधिक, पुरवठा कमी आहे. कारण यावल, रावेर, जामनेर भागांतील जुनारी केळी बागा व पिलबागांची कापणी आटोपली आहे. मागील दीड महिन्यापासून केळीला प्रतिक्विंटल ११०० रुपयांवर दर आहे. उत्तरेकडे बॉक्समध्ये पाठविल्या जाणाऱ्या केळीस १५० ते २०० रुपये जादा (ऑन) दर मिळत आहेत. सध्या दर्जेदार केळीला ११३० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. दिल्ली, पंजाब, काश्मिरातून केळीची मागणी वाढली आहे. तेथे दर्जेदार केळीची आवश्यकता आहे. परंतु अशी केळी फारशी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.
थंडी अधिक असल्याने केळी पक्व होण्याची गती मंद होत आहे. केळीची कापणी व्हायला अधिकचे दिवस लागतील. रावेर, यावल भागात फेब्रुवारीत केळी उपलब्ध होईल. ठाणे, कल्याण व पुणे येथूनही मागणी कायम आहे. जळगाव, चोपडा भागातील केळी क्रेटमध्ये प्रतिदिन किमान ३० ते ३५ ट्रक पाठविली जात आहे.
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, बडवानी व खंडवा जिल्ह्यातही केळीची कापणी सुरू नाही. तेथेही फेब्रुवारीनंतर केळी कापणीसाठी उपलब्ध होईल. यामुळे केळीचे दर कमी होणार नाहीत, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
- 1 of 22
- ››