agriculture news in marathi, improvement in agriculture by 'Organize Capital' : Ramesh Chand | Agrowon

‘ऑर्गनाईज कॅपिटल’ आल्यास शेतीक्षेत्रामध्ये सुधारणा शक्य : रमेश चंद
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

औरंगाबाद : शेतीक्षेत्रात खासगी क्षेत्राचा हिस्सा केवळ दोन टक्‍के आहे. दुसरीकडे उद्योगक्षेत्राची शेतीक्षेत्रातील गुंतवणूक ०.५ टक्‍क्‍यापेक्षाही कमी आहे. ही गुंतवणूकवाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. जोवर शेतीक्षेत्रात ऑर्गनाईज कॅपिटल (संघटित गुंतवणूक) येणार नाही तोवर अपेक्षित सुधारणा शक्‍य नाही. शेती क्षेत्राकडे बाजार म्हणून नव्हे; तर गुंतवणुकीची संधी म्हणून पाहण्यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे मत निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : शेतीक्षेत्रात खासगी क्षेत्राचा हिस्सा केवळ दोन टक्‍के आहे. दुसरीकडे उद्योगक्षेत्राची शेतीक्षेत्रातील गुंतवणूक ०.५ टक्‍क्‍यापेक्षाही कमी आहे. ही गुंतवणूकवाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. जोवर शेतीक्षेत्रात ऑर्गनाईज कॅपिटल (संघटित गुंतवणूक) येणार नाही तोवर अपेक्षित सुधारणा शक्‍य नाही. शेती क्षेत्राकडे बाजार म्हणून नव्हे; तर गुंतवणुकीची संधी म्हणून पाहण्यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे मत निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी व्यक्त केले.

येथे आयोजित आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना रमेश म्हणाले, की कृषी क्षेत्राविषयी शासनकर्त्यांच्या नितींमध्ये सुधारणेसाठी निती आयोगाच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. ज्या भागात सिंचनाची सोय त्या भागातील उत्पादकता दुप्पट असे ढोबळ मानले जाते. हजारो करोड खर्चूनही सिंचनाचे क्षेत्र वाढण्याऐवजी कमीच झाले. यावर चिंतनाअंती शासनाने पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणली आहे. महाराष्ट्रातही कॅनॉल झाले; पण कमांड क्षेत्रात सिंचन झाले नाही. मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेतीमाल काढला की दर पडतात व नंतर वाढतात. यावर चिंतनातून प्रत्येक राज्याला मॉडेल मार्केट ॲक्‍ट दिला. उत्पादनात चढ-उतार आले तरी दरावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी निती आयोग विचार करते आहे. खूप लोक झाडे कापण्यासाठी परवानगी लागते म्हणून झाडे लावत नाहीत. त्यामुळे नितीमध्ये बदल येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

तंत्रज्ञानाचे अपडेशन, व्यवस्थापन गरजेचे
कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाबाबत संभ्रमाचे वातावरणच असते. तंत्रज्ञानाची एक आयुर्मर्यादा असल्याने जीवशास्त्रीय तंत्रज्ञानाचे अपडेशन आणि व्यवस्थापन आवश्‍यक आहेत. बीटी तंत्रज्ञानाचेही काहीसे असेच आहे. बीटी ने दहा वर्षे चांगले उत्पादन दिले. बीटीवरील संशोधन सर्वांना करण्याची संधी असती तर कदाचित खासगी क्षेत्रातून त्यावर पर्याय निर्माण केला गेला असता.

रमेश म्हणाले

  • पीकविमा परताव्याच्या कामामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होण्याविषयी गांभीर्याने विचार
  • मॉडल कॉन्ट्रॅक्‍ट फार्मिंग आणण्यासाठी प्रयत्न सुरू
  • देशाचा कृषी विकासदर गत दहा वर्षांत २.८ पेक्षा कमी झाला नाही
  • दोन वर्षांत डाळीची गरज भागविण्यात आपण स्वयंपूर्ण झालो
  • गटशेतीच्या माध्यमातून शेतीक्षेत्रातील जोखीम व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार होण्याची गरज

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...