agriculture news in Marathi, improvement in minimum temperature, Maharashtra | Agrowon

किमान तापमानात वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 जुलै 2018

पुणे ः राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची भूरभूर सोडल्यास ढगाळ हवामान होते. मराठवाडा विदर्भातही काही भागांत ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. मराठवाडा व विदर्भात कमाल तापमानात वाढ होऊन काही अंशी उकाड्यात वाढ झाली आहे. विदर्भातील अकोला येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, उच्चांकी ३६.० अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

पुणे ः राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची भूरभूर सोडल्यास ढगाळ हवामान होते. मराठवाडा विदर्भातही काही भागांत ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. मराठवाडा व विदर्भात कमाल तापमानात वाढ होऊन काही अंशी उकाड्यात वाढ झाली आहे. विदर्भातील अकोला येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, उच्चांकी ३६.० अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानाचा किंचित वाढला आहे. कोकणात कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान १९ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सोलापूर, जळगाव येथे ३२.० अंश सेल्सिअसची नोंद झाली. मराठवाड्यातील नांदेड येथे ३३.० अंश सेल्सिअस तापमान होते.  

उर्वरित भागात ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भात अकोला वगळत उर्वरित भागात २९ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते. रविवारी (ता. २९) राज्यातील अनेक भागांत ढगाळ, काही भागांत कडक ऊन पडल्याची स्थिती होती. 

 गुजरातच्या दक्षिण भागात समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच, उत्तरप्रदेशाच्या परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राचे समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागर ते अमृतसर, बरेली, सुलतानपूर, कलकत्ता या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मंगळवार (ता. ३१) ते गुरुवार (ता. २) या दरम्यान कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. रविवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील मंडणगड येथे ३०, वाल्पोई २०, कणकवली १०, मध्य महाराष्ट्रातील चंदगड, पन्हाळा, राधानगरी येथे १०, तर विदर्भातील गोरेगाव येथे २०, आमगाव, सालेकसा येथे १० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.
 
रविवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान ः अंश सेल्सिअसमध्ये 
मुंबई ३०.३, सांताक्रुझ ३०.८, अलिबाग ३०.६, रत्नागिरी २९.२, डहाणू ३१.६, पुणे २८.७, जळगाव ३२.४, कोल्हापूर २५.६, महाबळेश्वर १९.६, मालेगाव ३१.४, नाशिक २९.०, सांगली २६.५, सातारा २६.१, सोलापूर ३२.७, उस्मानाबाद ३०.१, औरंगाबाद ३१.०, परभणी ३२.९, नांदेड ३३.०, अकोला ३६.०, अमरावती २९.८, बुलढाणा ३०.६, चंद्रपूर ३२.२, गोंदिया २९.२, नागपूर ३२.१, वर्धा ३१.०, यवतमाळ २९.०.

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...