agriculture news in marathi, improvement in onion rates in Solapur | Agrowon

सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणा
सुदर्शन सुतार
मंगळवार, 14 मे 2019

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक कमी राहिली. पण या सप्ताहात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाली. त्यास प्रतिक्विंटलला सर्वधिक १२०० रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय काकडी, गाजरालाही चांगला उठाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक कमी राहिली. पण या सप्ताहात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाली. त्यास प्रतिक्विंटलला सर्वधिक १२०० रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय काकडी, गाजरालाही चांगला उठाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज ५० ते १०० गाड्यापर्यंत राहिली. त्यात सातत्य राहिले. पण आवकेत चढ-उतार राहिला. कांद्याची सर्व आवक ही स्थानिक भागापेक्षा बाहेरील जिल्ह्यातून झाली. गेल्या काही दिवसांतील कांदा आवक आणि दराचा विचार करता, कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाल्याचे दिसते. सर्वाधिक ९०० ते १००० रुपयांवर स्थिरावलेला कांदा दर या सप्ताहात १००-२०० रुपयांच्या फरकाने सुधारला. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय काकडी, गाजरालाही या सप्ताहात पुन्हा मागणी कायम राहिली.

वांगी आणि टोमॅटोचे दर काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवक प्रत्येकी ३० ते ६० क्विंटल प्रतिदिन इतकी राहिली. काकडी आणि गाजराची प्रत्येकी एकेक गाडीपर्यंत आवक राहिली. काकडीला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये, तर गाजराला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, तर टोमॅटोला किमान ६०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये दर मिळाला.

भाजीपाल्याच्या दरातील सुधारणा कायम 
भाजीपाल्याच्या दरातील सुधारणा या सप्ताहातही कायम होती. भाज्यांची आवक साधारण रोज ८ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. त्यातही कोथिंबीर, मेथी, चुक्‍याला उठाव राहिला. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ७०० ते ११०० रुपये, मेथीला ७०० ते १२०० रुपये आणि चुक्‍याला ३०० ते ६०० रुपये असा दर मिळाला. शेपूला ३०० ते ५०० रुपये, पालकाला २०० ते ३५० रुपये, असा दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...