agriculture news in marathi, Improvement of Parbhani fodder, fodder rates | Agrowon

परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे चारा उत्पादनात मोठी घट येणार आहे. येत्या काळात चाराटंचाईची समस्या  गंभीर होणार आहे. ही बाब विचारात घेऊन  गतवर्षीचा ज्वारीचा कडबा शिल्लक असलेले शेतकरी चारा साठवून ठेवत आहेत. त्यामुळे बाजारातील कडब्याची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारातील चारा-वैरणीचे दर आतापासूनच वाढले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत रब्बी ज्वारीच्या कडबा पेंढ्याच्या प्रतिशेकडा दरात ८०० ते १००० रुपयांनी वाढ झाली असून, त्याचा दर ३६०० ते चार हजारांवर पोचला आहे.

परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे चारा उत्पादनात मोठी घट येणार आहे. येत्या काळात चाराटंचाईची समस्या  गंभीर होणार आहे. ही बाब विचारात घेऊन  गतवर्षीचा ज्वारीचा कडबा शिल्लक असलेले शेतकरी चारा साठवून ठेवत आहेत. त्यामुळे बाजारातील कडब्याची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारातील चारा-वैरणीचे दर आतापासूनच वाढले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत रब्बी ज्वारीच्या कडबा पेंढ्याच्या प्रतिशेकडा दरात ८०० ते १००० रुपयांनी वाढ झाली असून, त्याचा दर ३६०० ते चार हजारांवर पोचला आहे.

रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. पाण्याअभावी अन्य चारापिकांचे क्षेत्रदेखील घटले आहे. मंगळवारी (ता. १३) ऊस वाढ्याचे दर प्रतिशेकडा ५०० ते ६०० रुपये, तर उसाच्या मोळीचे दर प्रतिशेकडा २००० ते २२०० रुपये होते. वाढीच्या आणि परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाचा दीर्घ खंड पडल्यामुळे कडबा तसेच धान्य उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारातील खरीप ज्वारीच्या (हायब्रिड) कडब्याची आवक कमी असून, कडब्याच्या पेंढ्याचे दर प्रतिशेकडा २००० ते २५०० रुपये पर्यंत पोचले आहेत.

नांदेड जिल्ह्यातून आलेल्या पिवळी ज्वारीच्या कडब्याचे दर प्रतिशेकडा ३००० ते ३३०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. मक्याच्या पेंढ्याचे दर प्रतिशेकडा ७०० ते १२०० रुपये आहेत.

 

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...