agriculture news in marathi, Improvements Ale in the market Satara | Agrowon

सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणा
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

सातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्या जुन्या आल्याच्या प्रतिगाडीस (एक गाडी ५०० किलो) सात ते आठ हजार रुपयांनी वाढ होऊन ३० ते ३१ हजार रुपये तर नवीन आल्यास प्रतिगाडीस २३ ते २५ हजार दर मिळत आहे. दरातील सुधारणेमुळे आले उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्या जुन्या आल्याच्या प्रतिगाडीस (एक गाडी ५०० किलो) सात ते आठ हजार रुपयांनी वाढ होऊन ३० ते ३१ हजार रुपये तर नवीन आल्यास प्रतिगाडीस २३ ते २५ हजार दर मिळत आहे. दरातील सुधारणेमुळे आले उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील आले सातारी आले म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरेगाव, सातारा, कराड, खटाव तालुक्यात लागवड होते. २५ ते ३० हजार रुपयांवरून मागील जून, जुलै महिन्यात आल्याचे दर १५ ते १६ हजार रुपयांवर आल्याने शेतकरी अडचणीत आले होते. आॅगस्ट महिन्यात आल्याच्या दरात अल्प प्रमाणात का होईना वाढ होण्यास सुरवात झाली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात तीन ते चार हजार रुपयांनी वाढ होऊन प्रतिगाडीस १९ ते २० हजार रुपये गेले होते. आॅक्टोबर महिन्यांच्या सुरवातीपासून पुन्हा आल्याच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.

सध्या प्रतिगाडी मागे सात ते आठ हजार वाढ होऊन प्रतिगाडीस ३० ते ३१ हजार रुपये दर मिळत आहे. तसेच नवीन लागवड (जूनमध्ये) झालेल्या आल्यास प्रतिगाडीस २३ ते २५ हजार रुपये दर मिळत आहे. दरातील वाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.   

किडींचा प्रादुर्भावामुळे काढणीवर भर
जिल्ह्यात मे महिन्यात करण्यात आलेल्या नवीन आले लागवडीस वातावरणातील बदलामुळे विविध किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. सध्या आले पिकावर कंदकुज, कंदमाशी, हुमणी, खोडकीड, पाने कुडतरणारी अळी, करपा या किडी दिसून येत आहेत. उष्णतेत वाढ झाल्याने किडी नियंत्रणात येत नसल्याने व दर चांगले असल्याने आले काढणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
सध्या नवीन आल्यास प्रतिगाडीस २३ ते २५ हजार रुपये दर मिळत आहे. थंडीत वाढ झाल्यास किडी नियंत्रणात येतील, असे शेतकरी सांगत आहे.

वातावरणात बदलामुळे किडी नियंत्रणात येत नाही व सध्या दरात वाढ झाल्याने नवीन आल्याचे काढणी केली जात आहे. थंडीत वाढ झाल्यास आल्यावरील कीड नियंत्रणास येण्यास मदत होणार आहे.
- संजय गोरे, प्रगतशील शेतकरी, पाल, ता. कऱ्हाड, जि. सातारा

माझ्या १५ गुंठे क्षेत्रातील आले पिकांस किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने काढणी केली. या क्षेत्रात नऊ गाड्याचे उत्पादन मिळाले असून प्रतिगाडीस सरासरी २५ हजार रुपये दर मिळाला आहे.
- संजय माने, प्रगतशील शेतकरी, काशीळ, ता. जि. सातारा.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...