‘अॅग्रोवन समृद्ध शेती बक्षीस योजना’ प्रचार रथाचे उद्‌घाटन

‘अॅग्रोवन समृद्ध शेती बक्षीस योजना’ प्रचार रथाचे उद्‌घाटन
‘अॅग्रोवन समृद्ध शेती बक्षीस योजना’ प्रचार रथाचे उद्‌घाटन

परभणी ः ‘अॅग्रोवन’च्या ‘समृद्ध शेती बक्षीस योजना २०१८’च्या प्रचार रथाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. २९) करण्यात आले.

अॅग्रोवनतर्फे १ नोव्हेंबर २०१८ ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ‘समृद्ध शेती बक्षीस योजना’ राबविण्यात येत आहे.या योजनेच्या माध्यमातून अॅग्रोवनच्या वाचकांना एकूण ३० लाख रुपयांहून अधिक रकमेची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.

प्रचार रथाचे उद्‌घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र येथे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या या वेळी कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. यू. एन. आळसे, अॅग्रोवन दिवाळी अंक २०१८ मध्ये यशकथा असलेले शेतकरी गणेश ढगे, प्रगतिशील शेतकरी विठ्ठल जवंजाळ, नरेश शिंदे, पंडित थोरात, सुभाष झाडे, दिनाजी ढगे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com