agriculture news in marathi, inauguration of black gram, green gram purchase center, akola, Maharashtra | Agrowon

मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या दिवशीच अाडवी अाली अार्द्रता
गोपाल हागे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

सध्या धान्यामध्ये अार्द्रता १६ ते १७ येत असल्याने खरेदी केंद्र सुरू झाले तरी प्रत्यक्ष खरेदी मात्र नाममात्र झाली  अाहे. शासन हमीभावाने एफएक्यू दर्जानुसार धान्याची खरेदी करीत असून, यासाठी धान्यात जास्तीत जास्त १२ पर्यंत आर्द्रता ग्राह्य धरली जाते.

अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मूग आणि उडीद हमीभाव खरेदी केंद्राचे शुक्रवारी (ता. १३) येथे उद्‍घाटन झाले. जिल्ह्याच्या इतर ठिकाणी केंद्र कार्यरत होणार अाहेत. मात्र सध्या धान्यामध्ये अार्द्रता १६ ते १७ येत असल्याने खरेदी केंद्र सुरू झाले तरी प्रत्यक्ष खरेदी मात्र नाममात्र झाली असल्याची माहिती मिळाली अाहे. शासन हमीभावाने एफएक्यू दर्जानुसार धान्याची खरेदी करीत असून, यासाठी धान्यात जास्तीत जास्त १२ पर्यंत आर्द्रता ग्राह्य धरली जाते.

सध्या मूग, उडीद तसेच सोयाबीनचा हंगाम सुरू झाला अाहे. बहुतांश ठिकाणी पावसामुळे धान्य अोले झाले अाहे, तर काही ठिकाणी वातावरणामुळे धान्यात अोलसरपणा वाढला. खुल्या बाजारात या धान्यांचे दर अचानक पडल्याने हमीभावाने खरेदीची सर्वत्र मागणी सुरू झाली होती. त्यामुळे शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. मात्र यासाठी शेतकऱ्यांना नावनोंदणी करण्याचे अादेश देण्यात अाले होते.

त्यानुसार ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात होती. अखेरीस शुक्रवारी अकोल्यात खरेदी केंद्राचा जिल्हा उपनिबंधक जी. जी. माळवे, जिल्हा पणन अधिकारी बजरंग ढाकरे, बाजार समिती सभापती शिरीष धोत्रे व इतरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

या वेळी विक्रीसाठी बोलविलेल्या शेतकऱ्यांचा बहुतांश माल हा अोलसर असल्याचे अाढळले. शेतमालातील अार्द्रता ही १६ ते १७ भरत असल्याचे सांगण्यात अाले. त्यामुळे प्रत्यक्षात जोमाने खरेदी मात्र सुरू झाली नव्हती. या खरेदी केंद्राची जबाबदारी बाजार समितीकडे देण्यात अाली असून, शेतकऱ्यांना एफएक्यू दर्जाचे धान्य विक्रीसाठी अाणण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.

नावनोंदणीची प्रक्रिया सुरू
शासनाने केलेल्या अावाहनानुसार अकोला जिल्ह्यात साडेअकराशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मूग, उडीद विक्रीसाठी नावनोंदणी केली अाहे. नावनोंदणीची प्रक्रिया सुरू अाहे. पहिल्या दिवशी १० शेतकऱ्यांना बोलविण्यात अाले होते. अातापर्यंत अकोला तालुक्यात ४८०, अकोट ३३३, मूर्तिजापूर २०३, तेल्हारा ९८ अशी १११४ शेतकऱ्यांची गुरुवारपर्यंत नोंदणी झाली होती. नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याने त्यात अाणखी वाढ झाली अाहे.

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...