agriculture news in Marathi, inauguration of vegetable quality centers in baramati on Thursday, Maharashtra | Agrowon

भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे बारामतीत गुरुवारी उद्‌घाटन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रात इंडो-डच प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स या उच्च भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे गुरुवारी (ता. २) उद्घाटन होणार आहे. भारतीय भाजीपाला उत्पादकांसाठी नवी दिशा देणारे हे भारतातील पहिलेच केंद्र आहे. 

बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रात इंडो-डच प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स या उच्च भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे गुरुवारी (ता. २) उद्घाटन होणार आहे. भारतीय भाजीपाला उत्पादकांसाठी नवी दिशा देणारे हे भारतातील पहिलेच केंद्र आहे. 
या संदर्भात आयोजित पत्रकार परीषदेत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार व कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली यांनी माहिती दिली. या वेळी शारदानगर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नीलेश नलावडे, प्रशांत तनपुरे, यशवंत जगदाळे, संतोष गोडसे आदी उपस्थित होते.

येत्या २ नोव्हेंबर रोजी भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे उद्घाटन नेदरलँडचे कृषिमंत्री अल्ड्रिक खियरवेल्ड यांच्या हस्ते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमास महाराष्ट्राचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री गिरीश बापट, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नेदरलँडचे कृषी सल्लागार वाउटर व्हेरे आदी उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी सकाळी दहा वाजता याचे उद्घाटन होणार असून, याचा औपचारिक सोहळा शारदानगरमधील अप्पासाहेब पवार सभागृहात होणार आहे. 

या संदर्भात श्री. पवार व डॉ. सय्यद म्हणाले, ‘‘आपल्याकडे भाजीपाल्याचे उत्पादन प्रतिचौरस मीटरमध्ये टोमॅटो २० किलो, ढोबळी मिरची, काकडी १०-१२ किलोच्या आसपास आहे. तेच उत्पादन तेवढ्याच क्षेत्रफळात दुपटीने, तिपटीने घेण्यासाठी व कमी कालावधीत जास्त उत्पादन व जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी नेदरलँडसारख्या देशाकडून तंत्रज्ञान घेण्याचा सामंजस्य करार २०१२ मध्ये झाला. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१५ मध्ये झाले. हा प्रकल्प आता पूर्ण झाला असून, राज्यातीलच नव्हे, तर देशातील भाजीपाला उत्पादकांसाठी तो आता सेवेत सज्ज होणार आहे. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी भाजीपाल्याच्या विविध जाती नेमक्या कशा वाढतात, त्यांचे उत्पादन कसे मिळते, हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वचा ठरणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...
केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही :...परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार...
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या...पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे...
मातीची हाक मातीचा कस घटल्यामुळे मरणपंथाला लागलेल्या जमिनी...
मातीच्या घनीकरणाने घटते उत्पादनजमीन खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण   ...
समजून घ्या जमिनीची आरोग्यपत्रिकाबऱ्याच शेतकऱ्यांकडे जमिनीची आरोग्यपत्रिका उपलब्ध...
सावधान, सुपीकता घटते आहे... पुणे : महाराष्ट्रातील भूभागाचे मोठ्या...
अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला जालन्यात...जालना : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या सकाळ-...
शून्य मशागत तंत्रातून कस वाढविला...मी १९७६ पासून आजपर्यंत जमिनीची सुपीकता...
सेंद्रिय कर्बावर अवलंबून जमिनीची सुपीकताजमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म हे...
भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड...सुरू उसात दक्षिण विभागात पहिला क्रमांक उरुण...
अतिपाण्यामुळे क्षारपड होतेय जमीनक्षारपड-पाणथळ जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी...
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...