Agriculture News in Marathi, Include sugar in bilateral trade agreement: ISMA | Agrowon

द्विपक्षीय व्यापार करारात साखरेचा समावेश करा : इस्मा
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017
नवी दिल्ली ः देशात अागामी दोन वर्षांत साखर उत्पादन वाढण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर साखरेच्या निर्यातीसाठी भारतीय साखर कारखानदार संघटनेने (इस्मा) शेजारील देशांबरोबरील होणाऱ्या द्विपक्षीय मुक्त व्यापार करारात साखरेचा समावेश करण्याची मागणी केली अाहे. याबाबत ‘इस्मा’ने वाणिज्य मंत्रालयाला सूचना केली अाहे.
 
नवी दिल्ली ः देशात अागामी दोन वर्षांत साखर उत्पादन वाढण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर साखरेच्या निर्यातीसाठी भारतीय साखर कारखानदार संघटनेने (इस्मा) शेजारील देशांबरोबरील होणाऱ्या द्विपक्षीय मुक्त व्यापार करारात साखरेचा समावेश करण्याची मागणी केली अाहे. याबाबत ‘इस्मा’ने वाणिज्य मंत्रालयाला सूचना केली अाहे.
 
देशात २०१८-१९ अाणि २०१९-२० या वर्षात अतिरिक्त साखर उत्पादन होणार असल्याचे संकेत मिळत अाहे. देशांतर्गत साखरेचे उत्पादन वाढल्यास स्थानिक पातळीवर साखरेच्या दरात घसरण होऊ शकते. यामुळे थकीत ऊसबिलाची समस्याही निर्माण होईल, असा दावा करत ‘इस्मा’ने साखर निर्यात वाढविण्याची गरज व्यक्त केली अाहे.
 
‘‘सध्या कृषी निर्यात धोरण तयार केले जात अाहे. त्यासाठी साखर निर्यात कशी वाढविता येईल, या मुद्द्यावर वाणिज्य मंत्रालयाने मते मागविली अाहेत. त्यावर इस्माने भारत अाणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय व्यापार करारात साखरेचा समावेश करण्याची सूचना केली अाहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.
 
बांगलादेशमधील रिफायनरींकडून भारतातील साखरेला प्राधान्य दिले जात अाहे. मात्र ब्राझीलमधील स्वस्त साखरेशी अाम्ही स्पर्धा करणे अशक्य अाहे, असे ‘इस्मा’ने नमूद केले अाहे.
 
साखर निर्यातीसाठी हवे योग्य धोरण
भारत अाणि श्रीलंकादरम्यान मुक्त व्यापार करारामुळे साखर निर्यातीला फायदा होणार असल्याची अाशा व्यक्त करण्यात अाली अाहे. भारताचा चीन अाणि इंडोनेशियाबरोबरचा व्यापार प्रतिकूल स्थितीत अाहे. चीन अाणि इंडोनेशिया हे जगातील मोठे साखर खरेदीदार देश अाहेत.
 
या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांत साखर निर्यातीसाठी योग्य असे देवघेव धोरण राबविण्याची गरज ‘इस्मा’ने व्यक्त केली अाहे. दरम्यान, देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल जागतिक बाजारपेठेत पोचावा यासाठी निर्यातीला प्रोत्साहन दिले जात असल्याचे यापूर्वी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले अाहे.
 
युरोपीय देशांत दहा हजार टन साखर निर्यात होणार
यंदाच्या हंगामात भारतातून युरोपीय देशांत दहा हजार टन साखर निर्यात करण्यासाठी केंद्राने परवानगी दिली अाहे. याबाबतची अधिसूचना विदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केली अाहे.देशातून साखर निर्यात करण्यासाठी २० टक्के शुल्क लागू अाहे. मात्र, युरोपीय देशांत एका विशिष्ट कोट्यातून साखर निर्यात केली जाणार असून त्यावर शुल्क नाही, असे स्पष्ट करण्यात अाले अाहे.
 
दरम्यान, देशात यंदा (२०१७-१८) २४.५-२५.० दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे. गेल्या वर्षीच्या हंगामात २०.१७ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...