agriculture news in marathi, incomplete info providing sugarcane Factories permits are stuck | Agrowon

अपूर्ण माहिती देणाऱ्या साखर कारखान्यांचे परवाने अडकले
मनोज कापडे
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

पुणे : राज्यातील ५५ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहे. अजून सहा कारखान्यांना लवकरच परवाना मिळणार असून, अपूर्ण माहिती देणाऱ्या ६० पेक्षा जास्त साखर कारखान्यांचे परवाने अडकले आहेत. एक नोव्हेंबरपासून हंगाम चालू करण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात ६० पेक्षा जास्त कारखान्यांनी तयारी केली आहे. यंदा गाळपात एकूण १८९ साखर कारखाने भाग घेण्याची शक्यता आहे.

पुणे : राज्यातील ५५ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहे. अजून सहा कारखान्यांना लवकरच परवाना मिळणार असून, अपूर्ण माहिती देणाऱ्या ६० पेक्षा जास्त साखर कारखान्यांचे परवाने अडकले आहेत. एक नोव्हेंबरपासून हंगाम चालू करण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात ६० पेक्षा जास्त कारखान्यांनी तयारी केली आहे. यंदा गाळपात एकूण १८९ साखर कारखाने भाग घेण्याची शक्यता आहे.

हंगाम सुरू करण्यासाठी साखर आयुक्तांचा परवाना बंधनकारक आहे. परवान्यासाठी कारखान्यांकडून ऑनलाइन माहिती मागविण्यात आली. मात्र अनेक कारखान्यांनी अपूर्ण माहिती दिल्यामुळे या कारखान्यांना परवाने देण्यात आलेले नाहीत, अशी माहिती साखर उद्योग सूत्रांनी दिली. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी साखर कारखान्यांना ऑनलाइन परवाना देण्याच्या सूचना गेल्या हंगामात दिल्या होत्या. त्यानंतर साखर आयुक्तालयाने ऑनलाइन परवान्यासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करून याच हंगामापासून हस्तलिखित परवान्याची पद्धत मोडीत देखील काढली आहे. 

पहिल्या टप्प्यात ५५ साखर कारखान्यांना साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्या डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाइन परवाना देत कामाला सुरवात करण्यात आली आहे. मात्र, वेगवान कामाच्या धोरणात कोणत्याही साखर कारखान्याला घाईघाईने परवाना दिला जाणार नाही. त्यासाठी अपूर्ण माहिती दिलेल्या कारखान्यांचे परवाने थांबविण्यात आले आहेत, असे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. 

मागील पाच वर्षांचे गाळप आणि साखर उत्पादन, उपलब्ध उसाचे क्षेत्र तसेच आर्थिक कामकाजाची माहिती साखर कारखान्यांकडे मागण्यात आली आहे. परवाना मिळालेले कारखाने एक नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष गाळप सुरू करण्याची शक्यता आहे. दुष्काळामुळे गेल्या हंगामात ३७३ लाख टन ऊस राज्यात होता. चालू हंगामासाठी ६५० लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.   

शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांना परवाना मिळण्यात अडचणी आहेत. तसेच ऑनलाइन परिपूर्ण माहिती न देणाऱ्या साखर कारखान्यांना पत्रे दिली जात आहेत. अपेक्षित माहिती मुदतीत न मिळल्यास अशा साखर कारखान्यांबाबत सुनावणी घ्यायची की परवाना दिला जाणार नसल्याचे नकारपत्र द्यायचे याविषयी साखर आयुक्त निर्णय घेतील, असे कारखाना सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...