विहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदला

विहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदला
विहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदला

नागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित करण्यात येणाऱ्या खासगी विहिरींच्या मोबदल्यात दीडपट वाढीचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. येत्या उन्हाळ्यापासून या विहीरधारकांना हा वाढीव मोबदला दिला जाणार आहे.

महाराष्ट्र पिण्याच्या पाणीपुरवठ्याचे अधिग्रहण करण्याबाबत अधिनियम १९८३ नुसार शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अधिनियमातील कलम तीनमधील तरतुदीनुसार पाणीटंचाई कालावधीत विहीर अधिग्रहणासाठी मोबदला दिला जातो. यापूर्वी विहीर मालकाला प्रतिदिन ३०० रुपये, तर पाणी उपसण्यासाठी डिझेल पंप किंवा वीज जोडणी उपलब्ध करून दिल्यास ४०० रुपये याप्रमाणे मिळत होते. अधिनियमातील कलम ८ (अ) आणि ८ (ब) नुसार खासगी जलसाठे अधिग्रहित केल्यानंतर दिला जाणारा मोबदला नव्याने निश्‍चित करण्यात आला आहे.

कलम आठ मध्ये करण्यात आलेल्या या सुधारणेनुसार आता विहीर मालक व अधिकारी यांना थेट या संदर्भाने कराराचे अधिकार देण्यात आले आहेत.  अधिग्रहित विहिरीचा मोबदला विहीर मालकाला दर तीन महिन्यांनी वेळच्या वेळी अदा करण्याचेही नमूद आहे. मोबदल्याची मागणी गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत यांच्याकडून येण्याची वाट न पाहता तपासणी करून मोबदला दिला जावा, नैसर्गीक आपत्ती निवारण साहाय्य लेखाशीर्षाअंतर्गत हा खर्च भागविला जाणार आहे. 

अशी झाली वाढ पूर्वी विहीर मालकाला प्रतिदिवस ३०० रुपये मिळत होते. त्यात वाढ करून ते ४५० रुपये करण्यात आले आहेत. त्यासोबतच वीज जोडणी किंवा डिझेल पंप पाणी उपसण्यासाठी उपलब्ध करुन दिल्यास ४०० रुपये दिले जात. आता यासाठी ६०० रुपये दिले जातील. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com