agriculture news in Marathi, Increase in area of ​​onion cultivation due to water scarcity | Agrowon

पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पीकबदल केला आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी कमी पाण्याच्या पिकांवर भर दिला आहे. रब्बी कांद्याच्या लागवडीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे विभागात रब्बी हंगामात एक लाख २१ हजार ७६० हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पीकबदल केला आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी कमी पाण्याच्या पिकांवर भर दिला आहे. रब्बी कांद्याच्या लागवडीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे विभागात रब्बी हंगामात एक लाख २१ हजार ७६० हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.

चालू वर्षी आॅक्टोबरपासून पाणीटंचाई सुरू झाली आहे. रब्बी हंगामात पिकांना लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, कांदा भाजीपाला पिके घेण्यावर भर दिला आहे. रब्बी कांदा तीन ते चार महिन्यांत काढणीस येत असून, पाण्याचा ताण पडला तरी हातात काहीतरी प्रमाणात उत्पादन हाती येईल, या उद्देशाने अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. 

शेतकरी वर्षभरामध्ये खरीप, लेट खरीप, रब्बी (उन्हाळी) हंगामात कांद्याची लागवड करतात. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांद्याची लागवड केली आहे. यंदा पावसाळ्यात कमी पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी केल्या होत्या. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. त्यातच रब्बी हंगामातील कांद्याचेही उत्पादन निघणार आहे. त्यामुळे खरीप, लेट खरीप हंगामात उत्पादित झालेल्या कांद्याची विक्री करत आहे. बाजारात एकाच वेळी आवक वाढत असल्यामुळे कांद्याच्या दरावर परिणाम होत आहे. सध्या किरकोळ विक्रीच्या ठिकाणी कांद्याचा प्रतिकिलोचा दर १० ते २० या दरम्यान असला तरी कांद्याच्या मार्केटमध्ये हा दर अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकांतून मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. 

पुणे विभागातील नगर जिल्ह्यात पारनेर, श्रीगोंदा, कोपरागाव, राहुरी, नेवासा, नगर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ६०० हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. जामखेड, शेवगाव, पाथर्डी, अकोले, श्रीरामपूर या तालुक्यांत कमी लागवडी झाल्या आहेत. 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सर्वाधिक १० हजार ७० हेक्टरवर लागवड झाली आहे. शिरूर, खेड, बारामती, दौड, आंबेगाव या तालुक्यांतही बऱ्यापैकी कांदा लागवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळे, माढा या तालुक्यांत बऱ्यापैकी कांदा लागवडी झाल्या आहेत. करमाळा, पंढरपूर, सोगाला, मंगळवेढा, माळशिरस, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांत पाणीटंचाई अधिक आहे. त्यामुळे कमी प्रमाणात लागवडी झाल्या आहेत.

जिल्हानिहाय झालेली कांदा लागवड, क्षेत्र हेक्टरमध्ये  
जिल्हा झालेली लागवड 
नगर ७३,८९१ 
पुणे ३८,७२५ 
सोलापूर ९१५०

 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...