agriculture news in marathi, Increase in the area of cash crops can increase farmers income | Agrowon

नगदी पिकांच्या क्षेत्रवाढीतून शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ शक्य
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

पुणे : ‘शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी अन्नधान्य पिकाखालील क्षेत्र कमी करून उत्पादकता वाढवावी लागणार आहे. शिवाय नगदी पिकांचे क्षेत्रही वाढविणे गरजेचे आहे, असे मत माजी कुलगुरू डॉ. व्यकंट मायंदे यांनी गुरुवारी (ता. १६) व्यक्त केले.

अफार्म संस्थेच्या वतीने आयाेजित महाराष्ट्राची शेती ः दशा आणि दिशा या विषयावर दाेन दिवसीय परिसंवादाचे आयाेजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने गुरुवारी (ता.१६) डॉ. मायंदे यांनी महाराष्ट्र राज्य कृषी नियाेजन या विषयावर सादरीकरण केले. यावेळी अफार्मचे अध्यक्ष डाॅ. द्वारकादास लाेहिया, कार्यकारी संचालक सुभाष तांबाेळी आदी मान्यवर उपस्थित हाेते.

पुणे : ‘शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी अन्नधान्य पिकाखालील क्षेत्र कमी करून उत्पादकता वाढवावी लागणार आहे. शिवाय नगदी पिकांचे क्षेत्रही वाढविणे गरजेचे आहे, असे मत माजी कुलगुरू डॉ. व्यकंट मायंदे यांनी गुरुवारी (ता. १६) व्यक्त केले.

अफार्म संस्थेच्या वतीने आयाेजित महाराष्ट्राची शेती ः दशा आणि दिशा या विषयावर दाेन दिवसीय परिसंवादाचे आयाेजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने गुरुवारी (ता.१६) डॉ. मायंदे यांनी महाराष्ट्र राज्य कृषी नियाेजन या विषयावर सादरीकरण केले. यावेळी अफार्मचे अध्यक्ष डाॅ. द्वारकादास लाेहिया, कार्यकारी संचालक सुभाष तांबाेळी आदी मान्यवर उपस्थित हाेते.

डाॅ. मायंदे म्हणाले, ‘‘शेती हा राज्याचा विषय आहे असे म्हणत केंद्र शासन दिवसेंदिवस शेती क्षेत्राबाबतची जबाबदारी झटकत आहे. तर राज्याच्या नियाेजन मंडळात शेती क्षेत्राला दुय्यम स्थान असून या मंडळाच्या अनेक दिवसांपासून बैठकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे हे मंडळच अस्तित्वात नाही. परिणामी शेतीक्षेत्राचा विकास नियाेजनाअभावी ठप्प झाला आहे. यापूर्वी केंद्राच्या निधीवर केवळ याेजना तयार केल्या, त्याचे आर्थिक हिशाेब केंद्राला सादर करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या याेजनांचा लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही हे वास्तव आहे. धाेरणकर्त्यांनी केवळ आैद्याेगिक आणि सेवा क्षेत्रांच्या विकासासाठी अधिक काळजी घेत शेतीला दुर्लक्षित केले. यामुळे शेतीवर आधारीत व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न सरासरी केवळ २६ हजार रुपये आहे. तर इतर क्षेत्रावर आधारीत नागरीकांचे उत्पन्न १ लाख १७ हजार रुपये आहे.

शेतीमध्ये सिंचन, गुंतवणूक, प्रक्रिया, काटेकाेर शेती, संवर्धित शेती, अत्याधुनिक शेती, निर्यात, पणन आदि विविध क्षेत्रांसाठी काटेकार नियाेजनाची गरज आहे. यासाठी कृषी नियाेजन मंडळाला स्वतंत्र अधिकार देऊन शेती आणि संलग्न शेतीच्या विकासाचे नियाेजन हाेण्याची गरजही मायंदे यांनी व्यक्त केली.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...