agriculture news in marathi, Increase in commodity traffic rates | Agrowon

शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

जळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे दर मागील दोन वर्षांत लिटरमागे पाच रुपयांनी वाढून ७३ रुपयांवर गेले आहेत. परिणामी ग्रामीण भागातून शहरापर्यंत शेतमाल वाहतुकीचे दर गोणी किंवा पोत्यामागे १ रुपयाने वाढले आहेत. मळणी किंवा शेतीच्या मशागतीसंबंधी ट्रॅक्‍टर चालक, मालकांनी मात्र दरवाढ केलेली नाही. कारण दुष्काळी स्थिती आहे. 

जळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे दर मागील दोन वर्षांत लिटरमागे पाच रुपयांनी वाढून ७३ रुपयांवर गेले आहेत. परिणामी ग्रामीण भागातून शहरापर्यंत शेतमाल वाहतुकीचे दर गोणी किंवा पोत्यामागे १ रुपयाने वाढले आहेत. मळणी किंवा शेतीच्या मशागतीसंबंधी ट्रॅक्‍टर चालक, मालकांनी मात्र दरवाढ केलेली नाही. कारण दुष्काळी स्थिती आहे. 

जळगाव जिल्ह्यात केळीची शेती असली तरी ती सहा - सात तालुक्‍यांपुरती मर्यादीत आहे. उर्वरित आठ-नऊ तालुक्‍यांमध्ये बागायती क्षेत्र कमी, कापसाची शेती अधिक आहे. जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड ऑगस्ट व आता सप्टेंबरमध्ये पडला आहे. पिकांची स्थिती नाजूक आहे. या सगळ्या स्थितीत ट्रॅक्‍टरने रोटाव्हेटर, नांगरणीचे दर स्थिर आहेत. 

नांगरणीसाठी एकरी १२०० रुपये दर आहे. हाच दर मागील वर्षीही होता. तर रोटाव्हेटरसाठी काही तालुक्‍यांमध्ये एकरी ९०० तर रावेर, यावल भागात १००० रुपये दर आहे. हे दरही मागील वर्षाएवढेच आहेत. त्यात दरवाढ झालेली नाही. सध्या मूग, उडदाखालील क्षेत्रात रोटाव्हेटरची कामे काही भागात सुरू आहेत. ती जुन्याच दरांमध्ये संबंधित ट्रॅक्‍टरमालक, चालक करीत आहेत. 

सध्या उडदाची मळणी अनेक ठिकाणी सुरू आहे. अनेक शेतकरी बैलजोडीच्या साह्याने मळणी करून घेतात. काही शेतकरी मनुष्यबळाच्या आधाराने मळणी करून घेतात. मोठे शेतकरी मळणी ट्रॅक्‍टर चलित यंत्राने मळणी करून घेत असून, त्याचे दरही स्थिर आहेत. उडदाची मळणी एक क्विंटलसाठी २०० रुपये या दरात केली जात आहे. तर सोयाबीनच्या मळणीसाठीही २०० ते २१० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. या दरांमध्येही फारशी वाढ झालेली नाही. कारण उडदाचे हवे तसे उत्पादन आलेले नाही. 

शेतमाल शेतातून किंवा गावातून वाहतुकीसाठीचे दर मालवाहू चालकांनी किरकोळ स्वरुपात वाढविले आहेत. धान्य वाहतुकीसंबंधी १२ किलोमीटरसाठी ५० रुपये प्रतिपोते (९० ते ९५ किलोचे पोते) असे दर आहेत. दर शहरातून गावात रासायनिक खतांच्या वाहतुकीसाठी १० किलोमीटरसाठी प्रतिगोणी (४५ ते ५० किलोची एक गोणी) २० रुपये दर आहेत. एका गोणीमागे एक रुपये अधिक दर घेतले जात आहेत.

आमच्या भागात मळणी, ट्रॅक्‍टरने मशागतीसंबंधीचे दर गेल्या उन्हाळ्यातच किरकोळ स्वरुपात वाढले होते. आता इंधन दरवाढ सुरूच असली तरी पाऊस नसल्याने मशागत, मळणीचे दर ट्रॅक्टर चालक, मालक यांनी वाढविलेले नाहीत. 
- प्रवीण सपकाळे, शेतकरी, कानळदा, जि. जळगाव

इतर ताज्या घडामोडी
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
उन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...
पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...