agriculture news in marathi, Increase in cotton production through better management; Expert opinion | Agrowon

उत्तम व्यवस्थापनाद्वारेच कापसाच्या उत्पादनात वाढ; तज्ज्ञांचे मत
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 जुलै 2018

धुळे : कापूस पीक चांगले उत्पादन देते; परंतु त्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाचे खत व्यवस्थापन, फवारण्या आणि गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी प्रभावी कार्यवाही करायला हवी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

धुळे : कापूस पीक चांगले उत्पादन देते; परंतु त्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाचे खत व्यवस्थापन, फवारण्या आणि गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी प्रभावी कार्यवाही करायला हवी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ॲग्रोवन व स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजी लि. (पुणे) यांच्यातर्फे ‘कापूस लागवड तंत्रज्ञान व गुलाबी बोंड अळी` या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन शिरढाणे (जि. धुळे) येथे करण्यात आले. या वेळी धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील व कृषिविद्या शास्त्रज्ञ जगदीश काथेपुरी यांनी मार्गदर्शन केले. स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजी लि.चे वरिष्ठ व्यवस्थापक प्रदीप पाटील, विक्री प्रतिनिधी मार्तंड रनाळकर, शिरढाणेचे सरपंच कैलास पाटील, प्रगतिशील शेतकरी अमृत पाटील, खते वितरक अजय शिंदोडिया, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कापूस लागवडीस ७० दिवस झाल्यानंतर पिकात एकरी किमा दोन कामगंध सापळे लावावे. जैविक कीडनाशकांची फवारणी करून ही अळी नियंत्रणात आणता येते. निंबोळी अर्काची फवारणी निर्देशानुसार करावी.``

काथेपुरी म्हणाले, ‘‘कापसाचे खत व पाणी व्यवस्थापन यावर लक्ष दिले पाहिजे. नत्राची पुरेशी मात्रा मिळावी. लागवडीवेळी २० टक्के, ३० दिवसांनी ४० टक्के आणि नंतर ६० दिवसांनी ४० टक्के नत्र दिले पाहिजे. फुलगळ होत असल्यास तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार तातडीने फवारणी घ्यावी. तणनाशकांची फवारणी काळजीपूर्वक करावी. लागवडीला किमान ३५ दिवस झाल्यानंतरच तणनाशके फवारावीत. त्या वेळी आवश्‍यक काळजी घेतल्यास विषबाधा होत नाही.``

इतर बातम्या
शासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...
कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...