agriculture news in Marathi, increase in limit of tur purchasing, Maharashtra | Agrowon

विरोधकांच्या इशाऱ्यानंतर तूर खरेदीच्या मर्यादेत वाढ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मुंबई  : विरोधकांच्या आक्रमक इशाऱ्यानंतर राज्य सरकारने तूर खरेदीची एकरी मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तूर खरेदीची सध्याची एकरी मर्यादा कमी असल्याने शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी अडचण येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी तूर खरेदीची एकरी मर्यादा वाढविण्यात आल्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

मुंबई  : विरोधकांच्या आक्रमक इशाऱ्यानंतर राज्य सरकारने तूर खरेदीची एकरी मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तूर खरेदीची सध्याची एकरी मर्यादा कमी असल्याने शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी अडचण येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी तूर खरेदीची एकरी मर्यादा वाढविण्यात आल्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

राज्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांना एकरी सरासरी ८ ते १० क्विंटल उत्पादन झाले असताना सरकारने तूर खरेदीबाबत एकरी मर्यादा घालणारे परिपत्रक जारी केले होते. त्यावरून ‘उरलेल्या तुरीचे पीठ करून पकोडे तळायचे का,’ अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारला केली होती. या परिपत्रकानुसार खरेदी झाली तर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनाच्या एकतृतीयांश तूरदेखील हमीभावाने खरेदी होणार नसल्याचे सांगत या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले होते.

सरकारने शासकीय तूर खरेदीसाठी घातलेली जिल्हानिहाय एकरी मर्यादा शेतकरीविरोधी असून, या संदर्भातील परिपत्रक तातडीने मागे घेतले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावरून गोंधळ होत असल्याचे निदर्शनाला येताच सरकारने हा निर्णय मागे घेतल्याचे स्पष्ट केले आहे. 

पेरणी क्षेत्र १०० टक्के ग्राह्य धरणार
‘‘राज्यभरात १६० केंद्रांवर हमीभावाने तूर खरेदी १ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. तूर हे आंतरपीक असल्यामुळे किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदीसाठी आतापर्यंत उत्पादकता ठरविण्यासाठी तूर पेऱ्याखाली असलेल्या क्षेत्राच्या २० टक्के क्षेत्र ग्राह्य धरण्यात येत होते. ते क्षेत्र आता १०० टक्के ग्राह्य धरण्यात येईल. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तूर हे आंतरपीक असले तरी लागवडीखालील क्षेत्र मोजताना १०० टक्के क्षेत्र हे तूर लागवडीखाली असल्याचे ग्राह्य धरण्याबाबत सहमती झाली. यामुळे शासनाला शेतकऱ्यांकडून सध्या असलेल्या निकषांपेक्षा जास्त तूर हमीभावाने खरेदी करता येईल. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना याचा निश्चित लाभ होईल,’’ असे मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...