पाणी टॅँकरच्या संख्येत घट होण्याएेवजी वाढ

पाणी टॅँकरच्या संख्येत घट होण्याएेवजी वाढ
पाणी टॅँकरच्या संख्येत घट होण्याएेवजी वाढ

औरंगाबाद : पाणीसाठ्यांची स्थिती बिकट असलेल्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यात भर पावसाळ्यात तब्बल ३६० गावे, वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी ३८० टॅंकरची सोय करण्यात आली असून पावसाळ्यात टॅंकरच्या संख्येत घट होण्याची अपेक्षा असताना गत आठवड्याच्या तुलनेत या दोन्ही जिल्ह्यांत प्रशासनाला तब्बल २१ टॅंकर लोकांची तहान भागविण्यासाठी वाढविण्याची वेळ आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात स्थिती दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे.

जिल्ह्यातील ३०५ गावे व ११ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसते आहे. त्यासाठी ३२६ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद, फुलंब्री, पैठण, खुल्ताबाद व सिल्लोड या तालुक्‍यांमध्ये पाणीटंचाईची झळ अनुक्रमे जाणवत आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद, मंठा हे तीन तालुके टंचाईच्या झळा सहन करत आहेत. 

मराठवाड्यातील ७४६ लघू प्रकल्पांमध्ये केवळ १२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असून ३४ मध्यम प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. तीन मोठ्या प्रकल्पातही उपयुक्‍त पाणीसाठा नसून जालना औरंगाबादमधील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यांची स्थिती बिकट आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. तर तीन मध्यम प्रकल्पात केवळ २ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 

जालना जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पात केवळ ८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. तर २ मध्यम प्रकल्पात उपयुक्‍त पाणीच नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांमध्ये ६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात केवळ १ टक्‍का उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. 

बीड जिल्ह्यातील १२६ लघू प्रकल्पांमध्येही केवळ ४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीसाठ्यांबरोबरच दरदिवशी वाढत चाललेल्या पाणीटंचाईने दोन्ही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनता हैराण असल्याचे चित्र आहे. टॅंकर व थेट पाणीपुरवठ्यासाठी तूर्त औरंगाबाद जिल्ह्यातील १८४, जालना जिल्ह्यातील ११३ व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्हा तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे व टँकर्स
गंगापूर ९२ ७८
वैजापूर ५८ ६६
औरंगाबाद ५१ ५०
फुलंब्री २५ ३२
पैठण ३४ ३९
खुलताबाद २५ २७
सिल्लोड ३१ ३४
जालना जिल्हा तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे व टँकर्स
भोकरदन २४ ३२
जाफ्राबाद १५ १८
मंठा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com