agriculture news in marathi, Increase the organic organic curb for pomegranate productivity | Agrowon

डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवा
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

सोलापूर : ‘‘निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी पाणी, खताचे योग्य नियोजन आवश्‍यक आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवल्याशिवाय गुणवत्ता आणि उत्पादकता मिळू शकरणार नाही``, असे मत महाराष्ट्र रेसीड्यु फ्री ॲण्ड ऑरगॅनिक फार्मर्स असोसिएशनचे (मोर्फा) अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी शनिवारी (ता.६) येथे व्यक्त केले.

सोलापूर : ‘‘निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी पाणी, खताचे योग्य नियोजन आवश्‍यक आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवल्याशिवाय गुणवत्ता आणि उत्पादकता मिळू शकरणार नाही``, असे मत महाराष्ट्र रेसीड्यु फ्री ॲण्ड ऑरगॅनिक फार्मर्स असोसिएशनचे (मोर्फा) अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी शनिवारी (ता.६) येथे व्यक्त केले.

‘सकाळ-ॲग्रोवन'तर्फे आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनात ‘निर्यातक्षम डाळिंब उत्पादन आणि गटशेती'' या विषयावर पडवळे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘डाळिंबाची लागवड आणि त्याचे अंतर याचाही विचार होणे आवश्‍यक आहे. डाळिंबातील लागवड अंतर हे १५ बाय ८, १५ बाय ९ असे ठेवावे. लागवडीपूर्वी बागेमध्ये ताग, धैंचाची पेरणी करावी. १५ ते २० टक्के फुलोऱ्यात आल्यानंतर ते जमिनीत गाडावे. सेंद्रिय कर्ब वाढण्याचा जमिनीची प्रत सुधारण्यासाठी चांगला उपयोग होतो. लागवडीनंतर पहिल्या दोन वर्षांत बागेला पाणी अत्यंत मोजके आणि गरजेनुसारच द्यावे. पाण्याच्या अनियंत्रित वापरामुळेच तेलकट डागासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. झाडाला प्रत्यक्ष पाण्याची गरज किती? हे लक्षात घेतले जात नाही. खताच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. पहिल्या दोन वर्षांत रासायनिक खते अजिबात द्यायचीच नाहीत. त्याऐवजी कुजलेले शेणखत किंवा जैविक खतांचा वापर करावा.''

‘‘डाळिंबामध्ये आंतरपीक घेताना अनेकजण टोमॅटो घेतात, पण हे बुरशीजन्य रोगाला दिलेले आमंत्रण आहे. आंतरपीक घ्यायचेच असेल, तर झेंडू घ्या, अन्यथा घेऊच नका. मुख्य असणाऱ्या डाळिंब झाडालाच योग्य पद्धतीने वाढू द्या. त्याचा बहार संपल्यानंतर विश्रांतीच्या काळाचे वेगळे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. बहारानंतर पहिल्या पंधरा दिवसांत डोस द्यावा. त्यानंतर किमान तीन डोस द्यायला हवेत. झाडाला ताण देताना ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी पानगळ झाली पाहिजे,'' असेही पडवळे यांनी सांगितले. या वेळी त्यांनी निर्यातक्षम डाळिंबासाठी कराव्या लागणाऱ्या विविध मुद्द्यांची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची उत्तरे दिली.

इतर बातम्या
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...