agriculture news in marathi, to increase production, yield concentrate on group farming says CM | Agrowon

उत्पादन, उत्पन्नवाढीसाठी गटशेतीची कास धरा : देवेंद्र फडणवीस
संतोष मुंढे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

देळेगव्हाण, जि. जालना  : शेती क्षेत्र घटत चालल्याने शेतीतील गुंतवणूकही घटत चालली आहे. त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर होत आहे. शेतीचे क्षेत्र, उत्पादकता आणि त्यामधील गुंतवणूक वाढविण्याची नितांत गरज असून त्यासाठी गटशेती हा एकमेव सक्षम व सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

देळेगव्हाण, जि. जालना  : शेती क्षेत्र घटत चालल्याने शेतीतील गुंतवणूकही घटत चालली आहे. त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर होत आहे. शेतीचे क्षेत्र, उत्पादकता आणि त्यामधील गुंतवणूक वाढविण्याची नितांत गरज असून त्यासाठी गटशेती हा एकमेव सक्षम व सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ॲग्रो इंडिया गटशेती संघाच्या देळेगव्हाण (ता. जाफराबाद) येथे आयोजित १४६ व्या द्वादश कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले, गटशेतीसाठी राज्य शासनाने धोरण जाहीर केले आहे. त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात ठेवण्यात आहे. गटशेतीतील शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत.

गटशेती करणाऱ्या गटाला एक कोटी रुपयांचा अतिरिक्‍त लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांकडील शेती हेक्‍टरवरून गुंठ्यावर आल्याने कमी शेतात यांत्रिकीकरणाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे आधुनिक तंत्राच्या साहाय्याने उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करता येणे शक्‍य होत नाही.

तसेच शेतीत गुंतवणूक नसल्याने शेतीचा विकासदर कायम घटत होता. यासाठी शासनाने पहिल्याच वर्षी शेती गुतवणुकीसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली. शेतकऱ्यांनी माल व्यापाऱ्यांना न विकता नोंदणी करून केंद्रावर विकावा जेणेकरून शेतकऱ्यांची लूट होणार नाही. शेतकऱ्यांना व्यापारी व्यवस्थेच्या लुटीच्या कचाट्यातून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कर्जमाफीचा दिलासा देण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले. ऍग्रो इंडिया गटशेती संघाचे प्रमुख व मार्गदर्शक डॉ. भगवान कापसे यांनी प्रास्ताविक केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देळेगव्हाण येथील जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत बांधलेल्या बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचे पूजन केले. त्यानंतर ॲग्रो इंडिया गटशेती संघांतर्गत गटशेतीची कृपा'' नावाने घराची वास्तू उभारणारे प्रगतिशील शेतकरी बाळू कापसे यांच्या शेतातील गटशेतींतर्गत शेततळ्याची व पिकाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी कापसे दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. 

   मुख्यमंत्र्यांना दिले दोन प्रस्ताव

- संरक्षित शेतीत संकरीत भाजीपाला बिजोत्पादन आरकेव्हीवायच्या पीपीपी प्रोजेक्‍टअंतर्गत दीडशे शेडनेटमध्ये राबविण्याचा मानस असलेला प्रस्ताव.
- विदर्भातील अमरावती, अकोला व नागपूर यासह औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील कपाशीचे  उत्पादन एकरी किमान वीस क्‍विंटलपर्यंत कसे वाढविता येईल यासाठी तीन वर्षाचा प्रोजेक्‍ट सादर केला गेला.

इतर बातम्या
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
बॅंकेच्या चकरा अन् कागदपत्रांच्या...धुळे ः मागील दोन - तीन महिन्यांपासून पीककर्जासाठी...
‘ई-नाम’मधील १४५ बाजार समित्यांसाठी हवेत...पुणे ः शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल देशातंर्गत...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
भारताकडून अमेरिकेच्या हरभरा, तुरीच्या...नवी दिल्ली ः अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या...
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरीपुणे ः राज्यातील अनेक भागांत शुक्रवारी (ता. २२)...