धान भरडाईसाठी प्रतिक्विंटल ३० रुपयांचा वाढीव दर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई   : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०१७-१८ या हंगामामध्ये खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रतिक्विंटल दहा रुपये भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून ३० रुपये वाढीव भरडाई दर देण्याचा निर्णय बुधवारी (ता. ३) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार धानाच्या भरडाईसाठी मिलर्सना क्विंटलमागे ४० रुपये मिळणार आहेत.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये यासाठी राज्य शासन धान्याची आधारभूत किमतीने खरेदी करते. या योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धानाची भरडाई मिलर्सकडून करून घेऊन मिळणारा तांदूळ (कस्टम मिल्ड राइस) भारतीय अन्न महामंडळाकडे जमा करण्यात येत होता. केंद्र शासनाने धानासंदर्भात केलेल्या शिफारशीनुसार हंगाम २०१६-१७ पासून राज्यात विकेंद्रित खरेदी योजना राबविण्यात येत आहे.

भरडाईविना शिल्लक राहत असलेल्या धानाची भरडाई पूर्ण होणे गरजेचे असल्यामुळे भरडाईचे वाढीव दर निश्चित करणे गरजेचे होते. भरडाईअभावी धानाची नासाडी टाळणे, तसेच दीर्घकाळ साठवणुकीच्या खर्चाचा भार टाळण्यासाठी राज्य शासनाने या वर्षीच्या हंगामासाठीही केंद्र शासनाच्या मंजूर दराव्यतिरिक्त ३० रुपये प्रतिक्विंटल असा वाढीव दर जाहीर केला आहे. २०१७-१८ मध्ये खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईसाठी होणाऱ्या ७ कोटी ८० लाख रुपये इतक्या वाढीव खर्चासही बुधवारी मंजुरी देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com