तांदूळ निर्यातीत होतेय वाढ

तांदूळ निर्यातीत होतेय वाढ
तांदूळ निर्यातीत होतेय वाढ

नवी दिल्ली/मुंबई ः यंदाच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारतातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीमध्ये वाढ झाल्याची माहिती अपेडाने नुकतीच दिली आहे. यामध्ये बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यात प्रमुख आहे. गेल्या वर्षी या कालावधीत 2.07 दशलक्ष टन तांदळाची निर्यात झाली होती. ती यंदा वाढून 2.13 दशलक्ष टन झाली आहे.

अपेडाने दिलेल्या माहितीनुसार 2016 मध्ये (एप्रिल ते सप्टेंबर) बासमती तांदळाची निर्यात 1.63 अब्ज डॉलर होती. ती यंदाच्या कालावधीत 2.13 अब्ज डॉलरपर्यंत पोचली आहे. गेल्या वर्षी बिगर बासमती तांदळाची 1282 दशलक्ष डॉलर निर्यात होती. ती आता 1693 दशलक्ष डॉलरपर्यंत वधारली आहे.

व्यापारी आणि निर्यातकांनी दिलेल्या माहितीनुसार युरोपसह भारतीय तांदळाचा प्रमुख आयातदार असलेल्या इराणणे आयात निर्यातीचे नियम कडक केले आहेत. याची प्रभावी अंलबजावणी सुरू होईपर्यंत शक्‍य तेवढा तांदळाचा साठा करून ठेवायचा, असा तेथील व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे. यामुळे तांदळाला मागणी वाढून निर्यात वधारली आहे.

गवारगमची निर्यातही वाढली 2016 मध्ये (एप्रिल ते सप्टेंबर) गवारगमची 163,958 टन निर्यात झाली होती. त्यामध्ये वाढ होऊन यंदाच्या कालावधीत ती 252,568 टनांपर्यंत पोचली आहे.

युरोपने  नियम कडक केले युरोपीयन संघाच्या अन्न सुरक्षा संस्थेने (इएफएसए) तांदळाच्या आयातीबाबत यंदा कठोर नियमावली केली आहे. 1 नोव्हेंबरपासून याबाबतीत अंमलबजावणीही सुरू झाली आहे. यामुळे तांदळात रासायनिक अंशाबाबतचे आव्हान असून ते अतिशय कमी ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे अपेडाचे म्हणणे आहे.  

तांदूळ निर्यात (दशलक्ष टनांत)
तांदूळ 2016-17 2017-18
बासमती 2066,956 2131,883
बिगर बासमती 3416,529 4141,791

(निर्यात ः एप्रिल ते सप्टेंबर )

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com