मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांत भर
मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांत भर

मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांत भर

औरंगाबाद : मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये गत आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली. जवळपास ५५ लाख ९ हजारांवर लोकांची तहान टॅंकरवर आहे. ३२३८ गावे, वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. प्रशासनातर्फे ३४२३ टॅंकरच्या मदतीने टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. 

तीन-चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. परंतु या पावसाचे प्रमाण कमी असल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्यास अजूनतरी हातभार लागत नसल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ७७० गावे व २७१ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसते आहे. या ठिकाणी ११५० टॅंकर्स सुरू आहेत. शिवाय ५३८ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. जालन्यातील ५४१ गावे, १२४ वाड्यांची तहान टॅंकरवर आहे. त्यासाठी ६८५ टॅंकर सुरू आहेत. ७२३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

परभणी जिल्ह्यातील ८० गाव व १५ वाड्यांसमोर पाणीटंचाईचा प्रश्‍न आहे. या गाव, वाड्यांना पाणीपुरवठ्यासाठी ९७ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. त्याव्यतिरिक्त ४७१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. हिंगोलीतील ४९ गावे, ५ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी ७२ टॅंकर सुरू आहेत. ५३१ विहिरी अधिग्रहित आहेत. नांदेडमधील ७७ गावे, २६ वाड्यांत पाणीटंचाई आहे. त्यासाठी १३२ टॅंकर सुरू आहेत. १०६६ विहिरी अधिग्रहित आहेत. 

बीड जिल्ह्यातील ६५८ गावे, ३४१ वाड्यांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ९४९ टॅंकर सुरू आहेत. शिवाय १०३० विहिरी अधिग्रहित आहेत. लातूरमधील ८३ गावे, १९ वाड्यांमधील टंचाई निवारण्यासाठी १०५ टॅंकरची सोय केली आहे. जिल्ह्यातील १०२२ विहिरींचेही पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण झाले आहे. उस्मानाबादमधील १६८ गावे, ११ वाड्यांमध्ये पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. या ठिकाणी २३३ टॅंकर सुरू आहेत. ९८२ विहिरीदेखील अधिग्रहित आहेत, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com