agriculture news in marathi, Increase in soybean prices in the peak market | Agrowon

कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ
विनोद इंगोले
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

नागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर होते. सोयाबीनच्या दरात येत्या काळात फारशी वाढ अपेक्षित नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. ३०५० ते ३३५१ रुपये क्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत.

नागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमालाचे भाव स्थिर होते. सोयाबीनच्या दरात येत्या काळात फारशी वाढ अपेक्षित नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. ३०५० ते ३३५१ रुपये क्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत.

गेल्या आठवड्यात सोयाबीनचे व्यवहार ३०५० ते ३२५० रुपये क्‍विंटलने होत होते. त्यात किंचितशी वाढ होत हे दर ३३५१ रुपये क्‍विंटलवर पोचले. सोयाबीनची आवक गेल्या आठवड्यात अवघी ६०० क्‍विंटल असताना, ती वाढून १३०० क्‍विंटलवर पोचल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सोयाबीनचे दरात तेजी आली असताना, भुईमूग शेंगाचे दर मात्र खाली आले. गेल्या आठवड्यात ३००० ते ४००० रुपये क्‍विंटलचे शेंगाचे दर होते. आता हे दर ३२०० ते २६०० रुपयांपर्यंत खाली आले. शेंगाची आवक ५० ते ६० क्‍विंटल इतकी आहे. सरबती गव्हाचीदेखील बाजारात आवक असून, २५०० ते २९०० रुपये क्‍विंटलने गव्हाचे गेल्या आठवड्यात व्यवहार झाले; हे दर या आठवड्यात कायम होते.

गव्हाची सरासरी आवक २०० क्‍विंटलची आहे. लुचई तांदळाची सरासरी ५० क्‍विंटलची रोजची आवक आहे. २२०० ते २५०० रुपये क्‍विंटलवर तांदळाचे दर स्थिर आहेत. हरभरा दरदेखील खाली आले असून, ३६०० ते ४२०० रुपयांवर ते गेल्या आठवड्यात होते. या आठवड्यात हेच दर ३४०० ते ४०२६ रुपये क्‍विंटलवर आले आहेत. तुरीच्या दरातही घसरण झाल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. ३४०० ते ३६५१ रुपये क्‍विंटल तुरीचे दर होते. हे दर या आठवड्यात ३४०० ते ३५६८ रुपये क्‍विंटलपर्यंत खाली आले. तुरीच्या दरात आवकेनुसार चढ-उतार होण्याचा अंदाज आहे. सद्यःस्थितीत तुरीची २०० क्‍विंटलपर्यंतची आवक आहे.

संत्रा, मोसंबीची आवक वाढली
बाजारात संत्रा आणि मोसंबीची वाढती आवक आहे. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांचे व्यवहार १२०० ते १५०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. ७०० ते १००० क्‍विंटल अशी संत्र्यांची दर दिवसाची आवक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मध्यम आकाराची ९०० ते ११०० तर लहान आकाराच्या फळांचे व्यवहार ९०० ते १००० रुपये क्‍विंटलने होत आहेत. मोसंबीची आवकदेखील १ हजार क्‍विंटलच्या घरात आहे. १६०० ते २००० रुपये क्‍विंटलने मोसंबीचे गेल्या आठवड्यात व्यवहार होत होते. या आठवड्यातदेखील मोसंबीचे दर स्थिर होते. लहान आकाराच्या मोसंबीचे व्यवहार ८०० ते ११०० रुपये क्‍विंटलने, तर मध्यम आकाराच्या मोसंबीला १४०० ते १५०० रुपये क्‍विंटलचा दर होता.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...