agriculture news in Marathi, increase in vegetables in jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावात भाजीपाल्याच्या दरात तेजीचा कल
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वच भाजीपाल्याच्या दरात गत सप्ताहात तेजी दिसून आली. भरीताचे वांगे, मिरची, कांदे यांचा तुटवडा निर्माण झाल्याने या भाजीपाल्यास जास्त दर मिळाले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वच भाजीपाल्याच्या दरात गत सप्ताहात तेजी दिसून आली. भरीताचे वांगे, मिरची, कांदे यांचा तुटवडा निर्माण झाल्याने या भाजीपाल्यास जास्त दर मिळाले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

भरीताच्या वांग्याची गत सप्ताहातील आवक प्रतिदिन २१ क्विंटल एवढी राहिली. भरीताच्या वांग्याला १३०० ते २४०० व सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जिल्ह्यातून मुंबई, नाशिकपर्यंत भरीताची वांगी विक्रीसाठी पाठविली जातात. दिवाळीनंतर ही विक्री वाढते. अर्थातच भरीताच्या वांग्यांना मागणी वाढते असते. यातच वांग्यांची आवक हवी तशी नव्हती. त्यामुळे दर टिकून राहिले. किंबहुना अधिकचे दर मिळाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.  

यासोबत हिरव्या मिरचीची आवक कमी अधिक अशीच राहिली. हिरव्या मिरचीची प्रतिदिन ३६ क्विंटल अशी सरासरी आवक होती. हिरव्या मिरचीला १२०० ते २१०० व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर राहिला. लहान वांग्यांची आवक काहीशी वाढली. लहान वांग्यांची आवक प्रतिदिन २३ क्विंटल एवढी नोंदविण्यात आली. लहान वांग्यांना प्रतिक्विंटल ११०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले.

गवारची आवक फारशी नव्हती. गवारीची प्रतिदिन तीन क्विंटल अशी आवक नोंदविण्यात आली. या वेळी गावारीस १४०० ते  २४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला. कोथिंबीरची आवक प्रतिदिन दोन हजार जुड्या अशी राहिली. कोथिंबिरीस सरासरी १०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. कोबीची आवक प्रतिदिन २३ क्विंटल  होती. कोबीला कमाल २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर राहिला. कोबीची आवक फारशी वाढली नाही.

सोयाबीनला नाही उठाव
बाजार समितीत मुगाची आवक खूपच कमी होती. तर सोयाबीनला उठाव नव्हता. बाजार समितीत गत सप्ताहात मुगाची अतिशय तुरळक अशी आवक होती. या वेळी मुगाला प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. सोयाबीनची आवक वाढली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल २४०० रुपयांपासून दर होते. सोयाबीनची प्रतिदिन ७०० क्विंटल आवक राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

केळीचे दर ९०० पर्यंत
गत आठवड्यात केळीचे दर ९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहिले. रावेर बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांनुसार कांदेबाग केळीला ९०० रुपये, जुनारीला ८५० आणि वापसी केळीला ४१० रुपये प्रतिक्विंटल दर होता. १ ते ४ नोव्हेंबरपर्यंत केळीला ९०० रुपये कमाल दर होता. मागील महिन्यातही दर ९०० रुपयेच होते. यापुढे दर न गेल्याने केळी उत्पादकांचा काहीसा हिरमोड झाला. 

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...