कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडे बुधवारी (ता. २७) दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. अनेक ठिकाणी थांबून थांबून पाऊस सुरू होता. पूर्वेकडील तालुक्‍यात मात्र ढगाळ हवामान राहिले. धरणक्षेत्रात गेल्या दोन दिवसांत चांगला पाऊस झाल्याने नद्यांची पाणीपातळी वाढू लागली आहे. जिल्ह्यांतील बहुतांशी नद्या दुथडी भरून वाहत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

नद्यांना पाणी वाढू लागल्याने शेतकऱ्यांनी नदीकाठावरील पाणीउपसा यंत्रे काढून सुरक्षित ठिकाणी काढून ठेवण्यासाठी गडबड सुरू केली. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पावसामुळे जिल्ह्यातील १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे हे पाच बंधारे पाण्याखाली आहेत. तर कासारी नदीवरील यवलूज हा एक बंधारा पाण्याखाली गेला आहे.

पाटंबधारे विभागाच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २३ फूट ५ इंच, सुर्वे २२ फूट ६ इंच, रुई ५२ फूट, इचलकरंजी ४८ फूट, तेरवाड ४३ फूट, शिरोळ ३३ फूट, नृसिंहवाडी २४ फूट इतकी आहे.

बुधवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंतचा विविध प्रकल्पातील पाणीसाठा टी.एम.सी.मध्ये कंसात एकूण क्षमता ः राधानगरी - २.४४ (८.३६१), तुळशी १.६१ (३.४७१), वारणा १४.८० (३४.३९९), दूधगंगा ७.४० (२५.३९३), कासारी ०.७१ (२.७७४), कडवी १.३६ (२.५१५), कुंभी १.१६ (२.७१३), पाटगाव १.३२ (३.७१६), चिकोत्रा ०.१९ (१.५२२), चित्री ०.४२ (१.८८६), जंगमहट्टी ०.३७ (१.२०८), घटप्रभा १.५५ (१.५४५), जांबरे ०.३० (०.८२० टीएमसी) आणि कोदे ल. पा. ०.१२ (०.२१४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com