agriculture news in marathi, Increase in water scarcity proposal in Khandesh | Agrowon

खानदेशात पाणीटंचाईच्या प्रस्तावात वाढ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

जळगाव : खानदेशात पाणीटंचाईचे प्रस्ताव वाढत आहेत. तात्पुरत्या योजना राबवून, विहिरींचे खोलीकरण करूनही टंचाई दूर होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कारण भूगर्भात जलसाठेच मिळत नसल्याची स्थिती आहे. कूपनलिका २०० फुटांपेक्षा अधिक खोल करता येत नसल्याने स्रोत मिळण्याबाबत अडथळे येत असल्याचे सरपंच, ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या खानदेशातील टंचाईच्या प्रस्तावाची संख्या सुमारे ६० पर्यंत पोचली आहे

जळगाव : खानदेशात पाणीटंचाईचे प्रस्ताव वाढत आहेत. तात्पुरत्या योजना राबवून, विहिरींचे खोलीकरण करूनही टंचाई दूर होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कारण भूगर्भात जलसाठेच मिळत नसल्याची स्थिती आहे. कूपनलिका २०० फुटांपेक्षा अधिक खोल करता येत नसल्याने स्रोत मिळण्याबाबत अडथळे येत असल्याचे सरपंच, ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या खानदेशातील टंचाईच्या प्रस्तावाची संख्या सुमारे ६० पर्यंत पोचली आहे

नंदुरबार तालुक्‍यातील ३४ गावांमध्ये टंचाई भीषण आहे. शहादामधील पूर्व भागातही बामखेडा, जयनगर भागात टंचाई आहे. परंतु भीषण संकट नंदुरबारात आहे. विहिर अधीग्रहण, खोलीकरण व तात्पुरच्या योजना करूनही जलसंकट दूर होत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी टॅंकरचाच पर्याय असल्याचेही सांगण्यात आले. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे ३८, धुळे व नंदुरबारात सुमारे ४५ टॅंकर सुरू आहेत. त्यात मार्चअखेरीस आणखी वाढ होऊ शकते. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, धरणगाव, बोदवड व जामनेरात जलसंकट वाढत आहे. धुळ्यात शिंदखेडा, साक्रीचा उत्तर भाग आणि धुळे तालुक्‍यात सर्वत्र समस्या आहे. कापडणे, न्याहळोद, लामकानी, कौठळ, तामसवाडी, मोहाडीसारख्या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. जलस्त्रोत आटत आहेत. पांझरा नदीत पाणी सोडल्याने नेर, कुसुंबा भागाला अधिक लाभ होणार आहे. परंतु सर्वच गावांची समस्या सुटेल, अशी स्थिती नाही. 

अमळनेरात पांझरा व तापीकाठची गावे वगळता इतररत्र टंचाई तीव्र आहे. लोंढवे, डांगर, आंचलवाडी, मंगरूळ या गावांतील ही स्थिती आहे. टॅंकरसंबंधी ग्रामपंचायतींचे प्रस्ताव गटविकास अधिकारी, तहसील कार्यालयात येत आहेत. याबाबत प्रशासन वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर लागलीच निर्णय घेईल. तहसीलदार यांना याबाबतचे अधिकार प्रशासनाने दिले; परंतु एकाच वेळी मंजुरी मिळावी, असा उद्देश प्रशासनाचा असल्याचे सांगण्यात आले. जळगाव जिल्ह्यात ११९ गावे अधिक टंचाईग्रस्त आहेत. काही गावांमध्ये मार्चनंतर टंचाई वाढेल. यामुळे टंचाईनिधी वाढवावा लागण्याची शक्यता आहे.

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...