agriculture news in marathi, Increase in water scarcity in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यातील पाणीटंचाईत वाढ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे : जिल्ह्यात दुष्काळाची झळ दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे. जिल्ह्यातील टंचाई असलेल्या ३५ गावे ३७९ वाड्यांना ६१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील तब्बल १ लाख १८ हजार ३२० नागरिकांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागविली जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली. टॅंकरची संख्या झपाट्याने वाढत असल्याने भविष्यातील संभाव्य दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. 

पुणे : जिल्ह्यात दुष्काळाची झळ दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे. जिल्ह्यातील टंचाई असलेल्या ३५ गावे ३७९ वाड्यांना ६१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील तब्बल १ लाख १८ हजार ३२० नागरिकांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागविली जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली. टॅंकरची संख्या झपाट्याने वाढत असल्याने भविष्यातील संभाव्य दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. 

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने कोरडवाहू भागातील छोटे तलाव, बंधारे भरलेच नाहीत. काही ठिकाणी हंगामात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. ऐन हिवाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. जिल्ह्यातील भोर, मावळ, मुळशी आणि वेल्हा हे चार तालुके वगळता उर्वरीत ९ तालुक्‍यांत टॅंकर सुरू आहेत. बारामती तालुक्यात सर्वाधिक १९, तर शिरूर तालुक्यात १७ टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यात यात ५१ खासगी, तर १० सरकारी टॅंकर सुरू असून, १६ विहिरी आणि बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली.

जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबरच चारा टंचाई भासण्यास सुरवात झाली आहे. बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील शेतकरी संघटना आणि संस्थाकडून चारा छावणी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. चारा उपलब्धतेसाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न सुरू असून, चारा उत्पादनासाठी बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. अधिक चारा उत्पादन असलेल्या तालुक्यातून तो संकलित करून चारा टंचाई असलेल्या भागात पुरविण्यात येत आहे. 

तालुकानिहाय सुरू असलेली टॅंकर संख्या

तालुका गावे वाड्या  टॅंकर
बारामती १४ १५१ १९
शिरूर ५६ १७
आंबेगाव  २३ 
दौंड  ६३
जुन्नर ३७
खेड २९
पुरंदर  १८
हवेली
इंदापू १ 

 

इतर बातम्या
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज...नांदेड : लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
‘महाबीज’तर्फे बीजोत्पादनासाठी आगाऊ...जळगाव : आगामी खरिपासाठी सोयाबीन, उडीद, मूग, ताग,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकटनाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
पेमेंट न मिळाल्याने वसाकाच्या ऊस...नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...