agriculture news in marathi, Increased number of laborers due to low rainfall | Agrowon

कमी पाऊस झाल्याने मनरेगा’च्या मजुर संख्येत वाढ
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

नगर : पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट कायम आहे. दुष्काळाची तीव्रता गंभीर वळण घेत आहे. या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाद्वारे रोजगार हमीची कामे सुरू आहेत. पर्जन्यमानामुळे शेतीचे गणित विस्कटले आहे. शेतमजुरांना ‘मनरेगा’च्या कामाला जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

नगर : पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट कायम आहे. दुष्काळाची तीव्रता गंभीर वळण घेत आहे. या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाद्वारे रोजगार हमीची कामे सुरू आहेत. पर्जन्यमानामुळे शेतीचे गणित विस्कटले आहे. शेतमजुरांना ‘मनरेगा’च्या कामाला जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जिल्हाभरात ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांची मिळून ३४ हजार ९८२ कामे आहेत. त्यांची मजूरक्षमता २४ लाख पाच हजार आहे. सध्या यापैकी ग्रामपंचायत आणि इतर यंत्रणा मिळून एक हजार ९०२ कामे सुरू असून, सहा हजार ९३३ जणांना रोजगार हमी शाखेतर्फे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. आगामी काळात टंचाईमुळे मजुरांची आकडेवारी व कामांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. टॅंकरची संख्याही वाढत दोनवरून ५४ वर गेली आहे.

तालुकानिहाय कामे (कंसात मजुरांची उपस्थिती)
अकोले- १२९ (३५६), जामखेड- १७४ (६६७), कर्जत- २४३ (८३१), कोपरगाव- १४५ (२७८), नगर- १४५ (२७८), नेवासे- ७८ (३२१), पारनेर- १०१ (५५८), पाथर्डी- १६० (६०४), राहाता- ११९ (३४३), राहुरी- ८५ (२८०), संगमनेर- १८३ (५९६), शेवगाव- १३१ (६६९), श्रीगोंदे- ११३ (५१५), श्रीरामपूर- १०२ (४७४).

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत जेवढी मागणी होईल, तेवढ्या प्रमाणात मजुरांना काम दिले जाईल. पालकमंत्री राम शिंदे या संदर्भात आढावा घेणार आहेत. अपवादात्मक स्थिती निर्माण झाली, तर आम्ही त्याचा सामना करण्यास समर्थ आहोत.
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

 

इतर बातम्या
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटपपरभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये...
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणीनांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीतजळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या...
पाणीपुरवठ्यांच्या देयकासाठी दोन कोटीअकोला : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या...
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेगसांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला...
अपुऱ्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा...धुळे : पुरेशी सदस्यसंख्या नसतानाही (कोरम)...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणीसांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्रीसोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील...
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य...सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...