धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविले
धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविले

धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविले

नाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के यहां बाँब रखा हैं’ अशी धमकी तालुका पोलिसांना गुरुवारी (ता. १९) अज्ञाताकडून दूरध्वनीवर मिळाली; मात्र पोलिसांनी सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ बाँबशोधक-नाशक पथकाला पाचारण करत चार तास परिसर पिंजून काढला. मात्र, धोकादायक वस्तू आढळून आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गंगापूर धरण सुमारे ७८ टक्के भरले असून, धरणातून नाशिकला पाणीपुरवठा होतो. ७ वाजता तालुका पोलिस व बाँबशोधक-नाशक पथक गंगापूर धरणावर पोहचले. अत्याधुनिक धातुशोधक यंत्र, श्वान पथकाच्या माध्यमातून संपूर्ण धरणाचा परिसर पिंजून काढण्यात आला. रात्री साडेदहा वाजेपर्यंत धरणाच्या परिसरात शोधमोहीम व तपासणी सुरू होती. मात्र, पोलिसांना व बाँबशोधक पथकाला कुठलीही काहीही वस्तू आढळून आली नाही; पोलिसांनी धरणाच्या परिसरात गस्त वाढविली आहे. रात्रीदेखील विशेष पथकाद्वारे गंगापूर धरणाच्या परिसरात गस्त सुरू ठेवण्यात आली होती. याबाबत जलसंपदा विभागालाही विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, धरणाच्या परिसरात अज्ञात व्यक्तींना प्रवेश देऊ नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तालुका पोलिस ठाण्याच्या दूरध्वनीला कॉलरआयडी व्यवस्था नसल्यामुळे अज्ञात धमकीचा फोन कुठल्या क्रमांकावरून आला होता, हे निष्पन्न होऊ शकले नाही; मात्र पोलिसांनी याबाबत चौकशी करण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याच्या चमूला सूचना दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com