भूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट

भूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट
भूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट

अमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्‍यात गंभीर पाणी संकट निर्माण झाले आहे. पाणलोट क्षेत्रात उपलब्ध भूजलापेक्षा २५ ते ३० टक्‍के जादा उपसा होत असल्याने ही समस्या येत्या काळात आणखी गंभीर होण्याची भीती वर्तविली जात आहे. 

अमरावती जिल्ह्यात भूजलाच्या बाबतीत खारपाणपट्टा आणि काही भागात पाण्याचा प्रचंड उपसा या दोन समस्या अनेक वर्षांपासून आहेत. पावसाचे पाणी भूगर्भात मुरवण्याच्या कामाकडे गेल्या काही वर्षात लक्ष पुरवण्यात आले. हे काम समाधानकारक नाही. जिल्ह्यात तापी, पूर्णा आणि वर्धा नदीच्या खोऱ्यात एकूण ६३ प्रमुख पाणलोट क्षेत्र आहेत. यातील सात पाणलोट क्षेत्रे जादा उपशाची ठरविण्यात आली आहेत. काही भागात विहिरीतील पाणी पातळी खोल गेली. भूजल सर्व्हेक्षण यंत्रणेच्या अहवालानुसार वरुड तालुक्‍यातील एका पाणलोट क्षेऋात उपलब्ध भूजलसाठा ३ हजार ५७० हेक्‍टर मीटर एवढा असून उपसा ४ हजार १७४ हेक्‍टर मीटर आहे. याच तालुक्‍यातील दुसऱ्या पाणलोट क्षेत्राची स्थिती फारच चिंताजनक आहे.

या ठिकाणी उपलब्ध असलेला भूजलसाठा १० हजार हेक्‍टर मीटर आणि उपसा मात्र १५ हजार ७०५ हेक्‍टर मीटर आहे. वरुड, मोर्शी तालुक्‍यात विभागलेल्या तिसऱ्या पाणलोट क्षेत्रातही उपलब्ध भूजल २६४ हेक्‍टर मीटर, तर उपसा ३२८ हेक्‍टर मीटर आहे. अशा एकूण सात पाणलोट क्षेत्रात पाण्याचा उपसा अधिक झाल्याने गंभीर स्थिती आहे. मोर्शी, वरुड तालुक्‍यासह धामणगावरेल्वे, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर आणि भातकुली या तालुक्‍यात अतिउपसा झालेले पाणलोट क्षेत्र विभागले आहे.

नद्यांमधून वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्याने या क्षेत्रावर ताण आला आहे. भूजल पुनर्भरण करण्याच्या कामासाठी वेळेवर उपलब्ध होत नाही, अशी ओरड असताना या योजनांच्या अंमलबजावणीकडे सरकार उदासीन आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com