agriculture news in marathi, Increased worry in the Marathwada region | Agrowon

मराठवाड्यात पावसाच्या ओढीने वाढली चिंता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : पावसाच्या ओढीने मराठवाड्यातील खासकरून औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. परतीचा पाऊस अजून कृपाशील न झाल्याने खरिपाच्या पिकात शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार हे स्पष्ट आहे. सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झालेल्या सोयाबीनच्या पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादकतेविषयी स्पष्टता होणार आहे.

औरंगाबाद : पावसाच्या ओढीने मराठवाड्यातील खासकरून औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. परतीचा पाऊस अजून कृपाशील न झाल्याने खरिपाच्या पिकात शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार हे स्पष्ट आहे. सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झालेल्या सोयाबीनच्या पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादकतेविषयी स्पष्टता होणार आहे.

मराठवाड्यात २२ ऑगस्टनंतर पावसाने दिलेली ओढ अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. तुरळक ठिकाणी हलका, तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असला तरी परतीच्या पावसाचीही अजून सार्वत्रिक हजेरी लागली नाही. त्यामुळे रब्बीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मराठवाड्यातील जवळपास तेरा तालुक्‍यात वार्षिक अपेक्षेच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. त्यामुळे अशा तालुक्‍यांमधील पिकांची अवस्था बिकट बनली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर व खुल्ताबाद, नांदेड जिल्ह्यांतील देगलूर, बीड जिल्ह्यांतील बीड, आष्टी, गेवराई, शिरूर कासार, धारूर, लातूर जिल्ह्यांतील औसा तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, भूम, परंडा आदी तालुक्‍यांचा समावेश आहे.

अपेक्षेच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा किंचित जास्त ५५ टक्‍क्‍यांच्या आत पाऊस झालेल्या तालुक्‍यांची संख्याही बरीच असल्याने येत्या काही दिवसांत परतीचा पाऊस कृपावान न झाल्यास दुष्काळसदृश्‍य असलेली मराठवाड्यातील बहुतांश तालुक्‍यातील स्थिती अधिक भीषण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

अशीच स्थिती कायम राहिल्यास खरिपाची पीक हातची गेली असताना रब्बीचीही आशा नसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर आपल्या फळबागा वाचविण्याचे व पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याचे मोठे संकट उभे राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

इतर बातम्या
वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी...अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही...
निताने येथे वीजवाहक तारांच्या... नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील...
'वसाका'ची चाके पुन्हा फिरणारनाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव''...
‘जानेफळ येथे सोयाबीन पेंड प्रक्रिया...अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून...
अमरावती जिल्ह्‍यात कर्जवाटपात...अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...
फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या...जालना : सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट जालन्याच्या...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे नगर : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
सांगलीतील आवर्तन बंद होण्याची शक्यतासांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन...नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती...
लोकसहभागातून ग्रामविकास अभियान :...सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या...
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...