agriculture news in marathi, Increasing production of cotton crop through cotton crop planning | Agrowon

कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

सोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड करताना योग्य वाणांची निवड करावी. लागवडीचे अंतर, जल व खत व्यवस्थापन यासंदर्भात काटेकोर नियोजन केल्यास हमखास अधिक उत्पादन मिळते, असे मार्गदर्शन धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी विद्यावेत्ता जगदीश काथेपुरी यांनी येथे नुकत्याच आयोजित चर्चासत्रात केले.

सोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड करताना योग्य वाणांची निवड करावी. लागवडीचे अंतर, जल व खत व्यवस्थापन यासंदर्भात काटेकोर नियोजन केल्यास हमखास अधिक उत्पादन मिळते, असे मार्गदर्शन धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी विद्यावेत्ता जगदीश काथेपुरी यांनी येथे नुकत्याच आयोजित चर्चासत्रात केले.

कापूस लागवड व व्यवस्थापन हा चर्चासत्राचा विषय होता. ‘ॲग्रोवन’ आणि ‘स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजी ली.’ यांच्यातर्फे प्रीती मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख पंकज पाटील, स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजी ली.चे व्यवस्थापक गोरखनाथ बुधवंत, महाधनचे विपणन व्यवस्थापक विकास खैरनार, प्रगतिशील शेतकरी सुदाम श्रीराम पाटील, लक्ष्मी ट्रेडर्सचे संचालक नंदकुमार चौधरी, गणेश चौधरी उपस्थित होते.

कृषी विद्यावेत्ता काथेपुरी म्हणाले, की कापूस पिकाला रोगराईपासून दूर ठेवता यावे यासाठी यंदा कापूस बियाणे शासनाने उशिरा दिले. २५ मेनंतर पूर्वहंगामी कापूस लागवड व्हावी. पिकांची फेरपालट करावी. जेथे कापूस पीक होते. तेथे पुन्हा पुन्हा कापूस लागवड टाळावी. पूर्वहंगामी कापसासाठी ठिबक सिंचनाचा वापर लाभदायी ठरतो. लागवड योग्य अंतरातच झाली पाहिजे. कीटकनाशकांचा अतिवापर टाळला पाहिजे. खते व कीटकनाशके यासंबंधी कृषी विद्यापीठांच्या शिफारशींनुसार कार्यवाही केली जावी. बीटी कापसाचे उत्पादन वाढले. पण बीटीसोबत नॉन बीटी किंवा रेफ्यूज बियाण्याची लागवड करायला हवी.

स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजी ली.चे बुधवंत यांनी महाधन उत्पादनांबाबत माहिती दिली. सर्वच पिकांसाठी उपयुक्त अशा खतांची शृंखला ‘महाधन’ने बाजारात आणली आहे. महाधन दाणेदार युरिया लाभदायी ठरतो आदी मुद्दे त्यांनी सांगितले. चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. महाधनचे खैरनार यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...