agriculture news in marathi, Independent funds needed for the dairy business | Agrowon

दुग्ध व्यवसायासाठी हवा स्वतंत्र निधी
अरुण नरके
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

गेल्या वर्षभरात दूध व्यवसाय मोठ्या संकटाला तोंड देत आहे. राज्यातील काही मोजकेच दूध संघ वगळता बहुतांशी दूध संघ अडचणीत आहेत. यामुळे शेतकरी तोट्यात जात आहेत. सरकारचे याबाबतीत धोरण निश्‍चित नसल्याने शेतकऱ्यांबरोबर दूध संघासमोरही आर्थिक नुकसानीचा धोका तयार झाला आहे.

दू ध व्यवसायासाठी ठोस धोरण जाहीर होऊन त्यावर अंमलबजावणी झाल्याशिवाय सध्या तरी हा व्यवसाय उभारी घेण्याची शक्‍यता नाही. केंद्राने कृषी विभागाच्या अंतर्गतच दुग्ध व्यवसाय गृहीत धरला आहे. यामुळे दुग्ध व्यवसायासाठी स्वतंत्र निधी मिळत नाही. परिणामी, दूध व्यवसायासाठी अल्प रक्कम येते.

गेल्या वर्षभरात दूध व्यवसाय मोठ्या संकटाला तोंड देत आहे. राज्यातील काही मोजकेच दूध संघ वगळता बहुतांशी दूध संघ अडचणीत आहेत. यामुळे शेतकरी तोट्यात जात आहेत. सरकारचे याबाबतीत धोरण निश्‍चित नसल्याने शेतकऱ्यांबरोबर दूध संघासमोरही आर्थिक नुकसानीचा धोका तयार झाला आहे.

दू ध व्यवसायासाठी ठोस धोरण जाहीर होऊन त्यावर अंमलबजावणी झाल्याशिवाय सध्या तरी हा व्यवसाय उभारी घेण्याची शक्‍यता नाही. केंद्राने कृषी विभागाच्या अंतर्गतच दुग्ध व्यवसाय गृहीत धरला आहे. यामुळे दुग्ध व्यवसायासाठी स्वतंत्र निधी मिळत नाही. परिणामी, दूध व्यवसायासाठी अल्प रक्कम येते.

गेल्या वर्षभरापासून गायीच्या दुधाची विक्री होत नसल्याने आम्ही गायीच्या दुधाला अनुदान मागत आहोत. मध्यंतरी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला. त्यावेळी सरकारने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमून निर्णय घेण्याचे जाहीर केले. परंतू ती समिती नेमकी काय करते? याचा पत्ता नाही. समितीने अहवाल शासनाला दिला का? त्यावर काय उपाययोजना झाल्यात का? याची काहीच माहिती दूध संघांना नाही. गोकुळसारख्या संस्थांनी गायीच्या दुधाला दोन रुपये कमी केल्यानंतर कारवाईची भाषा झाली.

गोकुळ गायीच्या प्रतिलिटर दुधाला २५ रुपये देत आहे, तर इतर दूध संघामध्ये हाच दर २१ रुपये इतका आहे. इतके असूनही अद्यापही आम्ही तोटा सहन करीत आहोत. गोकुळसारख्या संस्थेकडे रक्कम असल्याने त्यातून तोटा भरून काढत आहोत. पण इतर दूध संघाचे काय?

शेतकऱ्यांना दुखवू नये म्हणून शासन दूध संघांच्या मानगुटीवर बसत आहे. परंतु संघांचा बोजा हटविण्यासाठी मात्र कोणतीच उपाययोजना केली जात नाही. शासनाने ठरविले तर विविध  निर्णय घेऊन उत्पादकांना दिलासा देऊ शकते, परंतु अलीकडे या उद्योगाच्या ऊर्जितावस्थेबाबत एकही सकारात्मक निर्णय झाला नाही.

आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून थकलो आहोत. पण कोणीच दाद घेत नसल्याची स्थिती आहे. एक लाख टनापेक्षा अधिक दूध पावडर शिल्लक आहे. किमती प्रतिकिलोस ५० रुपयांपर्यंत खाली आली आहे. पण याकडे कोणाचेच लक्ष नाही, अशी स्थिती सध्या आहे. सरकारने एक ब्रॅन्ड करण्यासारख्या अनेक घोषणा केल्या. पण कोणालाच विश्‍वासात घेतले नाही. खरं तर एक ब्रॅन्ड करणे शक्‍यच नाही. यापेक्षा दूध संघांची परिस्थिती कशी सुधारेल, याकडे जास्त लक्ष द्यायला हवे.    
(शब्दांकन ः राजकुमार चौगुले)

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...